Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

काश्मीरमध्ये घरपोच खाद्यपदार्थ वाटप

Share

श्रीनगर । राज्यघटनेतील कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील तणाव कमी करण्याचे वेगवेगळे प्रयत्न राज्य प्रशासनाकडून सुरू आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकाना जीवनाश्यक खाद्यपदार्थ घरपोच दिले जात आहेत. त्यात भाजी, अंडी, चिकन, स्वयंपाकाचा गॅस आदी वस्तूंचा समावेश आहे. काश्मीरमधील रेशनिंग व्यवस्थेमार्फत या वस्तूंचे घरपोच वितरण केले जात आहे. ईदनिमित्त नागरिकांशी संवाद साधून तणाव कमी करण्याचे प्रयत्न जम्मू-काश्मीर प्रशासन करीत आहे. सरकारकडे 65 दिवस पुरतील एवढे गहू, 55 दिवस पुरतील एवढे तांदूळ, 17 दिवस पुरतील एवढे मटण, एक महिना पुरेल एवढे चिकन, 35 दिवसांचे केरोसिन, एक महिन्याचे स्वयंपाकाचा गॅस तसेच 28 दिवस पुरेल एवढा पेट्रोल-डिझेलचा साठा आहे, असे सामान्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ईदनिमित्त सुमारे 300 टेलिफोन बूथ लावण्यात आले आहेत. या बूथमार्फत नागरिकांना आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा देता येतील. तसेच अलीगड, दिल्लीसह अन्य काही ठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना काश्मीर खोर्‍यात राहणार्‍या आपल्या कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!