श्रीनगर : बीएसएफ कॅम्पवर दहशतवादी हल्ला

0

मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या (BSF)  कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे.

दहशतवाद्यांनी श्रीनगर विमानतळाजवळील बीएसएफ कॅम्पमध्ये घुसले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र भारतीय सुरक्षा दलाकडूनही दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.

जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सध्या चकमक सुरू असल्याची माहिती आहे. यामध्ये दोन दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यशदेखील आले आहे.

बीएसएफच्या 182 बटालियनवर दहशतवाद्यांनी पहाटेच्या सुमारास हा हल्ला केला आहे.

LEAVE A REPLY

*