Type to search

Featured नाशिक

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेकडून बचत गटाच्या सभासदास मदतीचा धनादेश

Share

डुबेरे । वार्ताहर

महिला बचत गटाच्या सभासद असलेल्या महिलेस श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेने संस्थेअंतर्गत उतरविलेल्या विम्यापोटी पतिच्या निधनानंतर 50 हजार रुपयांची मदत केली. पति सभासद नसतांनाही संस्थेने मदत केल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना ठरली असून मदतीचा धनादेश चेअरमन नारायण वाजे यानी सदर महिलेला आज (दि. 11) प्रदान केला.

अवाजवी दर आकारुन पतपुरवठा करणाऱ्या फायनान्स कंपन्यांच्या जंजाळातून महिलांची सुटका करण्यासाठी श्रीमंत पतसंस्थेने पुढाकार घेतला असून गावातील जवळपास 12 महिला बचत गटांना अत्यल्प दरात अर्थसहाय्य केले आहे. गटातील प्रत्येक महिलेला 25 हजारांचे कर्ज असे एका गटाला अडीच लाख रुपयांचे कर्ज संस्थेने दिले आहे. महिला बचत गटाअंतर्गत जेव्हा कर्ज उचलतात, तेव्हाच गटातील प्रत्येक महिलेचा व तिच्या पतिचा 50 हजार रुपयांचा संस्था पातळीवर विमा उतरविण्याची तरतूद संस्थेने केली आहे.

श्री स्वामी समर्थ महिला बचत गटालाही पतसंस्थेने आर्थिक सहाय्य केले असून या गटाच्या सभासद मथुराबाई श्याम घेळ यांच्या पतिचे 22 फेब्रुवारी रोजी निधन झाले. पतसंस्थेने संस्था अंतर्गत विमा उतरविलेला असल्याने श्याम घेळ यांच्या वारस मथुराबाई घेळ यांना आज (दि.11) चेअरमन वाजे यांच्या हस्ते 50 हजार रुपये रकमेचा मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक भिमराव चव्हाण, व्यवस्थापक महेश कुटे, वसुली अधिकारी युनुस शेख, सचिन वाजे, भारती वाजे, बचत गटाच्या अध्यक्षा सुशिला वाजे, ज्ञानेश्वरी वाजे, छाया वारूंगसे, राधाबाई वाजे, विठाबाई वाजे, उषा वाजे, पुष्पा वाजे, चंद्रकला वाजे, इंदूबाई वामने यांच्यासह पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातून सुरु झालेली ही संस्था आज जिल्हाभरात नावारुपाला आली आहे. ग्रामीण भागातीलच बचत गटातील महिलांना कर्जपुरवठा करुन आर्थिक पिळवणूक करणाऱ्या मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्यांच्या फासातून या महिलांची सुटका करुन 12 महिला बचत गटांना संस्थेने 30 लाख रुपयांचे खेळते भांडवल यापूर्वीच वितरीत केले आहे. हे करत असतांनाच बचत गटातील महिला सभासद व तिच्या पतिचा 50 हजार रुपयांचा वैयक्तिक विमा संस्थेने उतरविला आहे. त्यातूनच मथुराबाईंना त्यांच्या पतिच्या निधनानंतर हा लाभ देण्यात आला आहे.

– नारायणशेठ वाजे, चेअरमन

दिलासादायक उपक्रम

मोलमजुरी करणाऱ्या बचत गटांच्या महिलांना उद्योग-व्यवसायात उभारी घेण्यासाठी पेशवे पतसंस्थेने खेळते भांडवल उपलब्ध करुन दिले आहे. या योजनेचा 12 बचत गटांनी लाभ घेतला आहे. संस्थेने गटातील प्रत्येक महिला व तिच्या पतिचा विमा उतरवला असल्याने आमच्या गटातील सभासद असलेल्या मथुराबाईंना मदतीचा लाभ मिळाला आहे.

– सुशिला वाजे, अध्यक्षा, श्री स्वामी समर्थ बचत गट

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!