श्रीगोंद्यातील जैन मंदिरातून पार्श्‍वनाथ मूर्तीची चोरी

0
अडीचशे वर्षे पुरातन मूर्ती; तपासाची सूत्रे वेगात
श्रीगोंदा (प्रतिनिधी) श्रीगोंदा शहरातील मेन रोड लगत असेलेल्या जैन पार्श्वनाथ मंदिरातील चोवीस तीर्थंकर पार्श्वनाथ मूर्ती सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास चोरीला गेली. साधरणपणे 250 वर्षे पुरातन पंचधातुची ही मूर्ती असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली. चोरीची घटना समजताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाच्या दिशेने चक्रे फिरविली आहेत.
श्रीगोंदा शहरात मेनरोड लगत पुरातन जैन मंदिर आहे . या मंदिरात चोवीस तीर्थंकरांची पंचधातूची मूर्ती असून काही मूर्ती संगमरवरी आहेत. दोन मूर्ती पंच धातुच्या होत्या. त्यातील आकारान मोठी असलेली भगवान पार्श्वनाथांची मूर्ती चोरीला गेली आहे. सकाळी नऊ वाजणयाच्या सुमारास प्रदीपकुमार बडजाते यांनी मंदिरात पुजा करुन शेजारी असलेल्या आपल्या घरी गेले. त्यानंतर त्यांची पत्नी ज्योती बडजाते ंया पुढील पूजापाठ करण्यासाठी अर्धा तासांनी मंदिरात आल्या. त्यावेळी मंदिरातील ओट्यावर मूर्ती नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती शेजार्‍यांना सांगितली. त्यानंतर संतोष सोनी यांनी मंदिरातून मूर्ती गायब असल्याचे पोलीस ठाण्यता फोन करून कळविले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

LEAVE A REPLY

*