भदे पती-पत्नीच्या खुनाचा निःपक्षपाती तपास व्हावा’; श्रीगोंदा तहसीलसमोर प्रहार संघटनेचे उपोषण
Share

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- मागील एक महिन्यापूर्वी गोरख भदे व त्यांची पत्नी सुरेखा भदे यांना जाळून मारण्यात आले. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाला. या दोघांच्या जबाबात पोलीस यंत्रणेने वेळेवर दखल घेतली नसल्याचे म्हटले आहे. या खुनाचा निःपक्षपातीपणे तपास व्हावा यासाठी तहसील कार्यालयासमोर प्रहार संघटनेचे साहेबराव रासकरांसह नातेवाईक तर दुसर्या घटनेत पोलिसांनी मारहाण केली असल्याने कोकणगावमधील कुटुंब उपोषणाला बसले आहेत.
गोरख भदे व शरद भदे यांचा शेत जमीन वाद 2017 पासून सुरू होता. याबाबत मयत गोरख भदे वारंवार पोलीस स्टेशनला तक्रार देत होते. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केले. यामुळे गोरख भदे व त्यांच्या पत्नीची हत्या झाली. याबाबत गुन्हा दाखल असला तरी निःपक्षपातीपणे व्हावा. खर्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करावेत. खोटे गुन्हेगार कोण आहेत याची खात्री करून ते कमी करावेत, तपासी अंमलदार यांची खातेनिहाय चौकशी व्हावी. यासाठी नातेवाईक उपोषणाला बसले आहेत.
तर दुसर्या उपोषणाला यशोदीप रतन आरू हे नातेवाईकांसह उपोषणाला बसले असून 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी वस्तीवर आलेले एलसीबीचे पोलीस यांनी चुलत भाऊ वैभव शेंडगे व विशाल शेंडगेंसह मला या पोलिसांनी बेदम मारहाण केली.
माझ्या भावाने एक मुलगी पळून नेली याची आम्हाला माहिती नाही तरी आम्हाला मारहाण केली आहे. सात पोलिसांनी गाडीत बसून घेऊन आढळगावमध्ये ढकलून दिले असल्याने या पोलिसांवर कारवाई व्हावी यासाठी आरू कुटुंब उपोषणाला बसले असून या दोन्ही प्रकरणांत न्याय मिळावा, असे प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक साहेबराव रासकर यांनी सांगितले.