Type to search

Featured सार्वमत

‘श्रीगोंद्या’वर शिवसंग्रामचा दावा

Share

अभिनेत्री दीपाली सय्यद लढणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- सिनेअभिनेत्री आणि शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा दीपाली सय्यद-भोसले यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. रविवारी सायंकाळी नगरमध्ये मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेत त्यांनी चाचपणी केली.
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी श्रीगोंदा मतदार संघात गेल्या अनेक दिवसांपासून जनसंपर्क वाढविलेला आहे. श्रीगोंदा व नगर तालुक्यातील दुष्काळी गावांना वरदान ठरणार्‍या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या मंजुरीसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे. तसेच मतदार संघातील गुंडेगाव येथे मोठ्या वृद्धाश्रमाचे कामही हाती घेतलेले आहे. त्यामुळे श्रीगोंदा मतदार संघात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. या कार्यकर्त्यांकडूनच दीपाली सय्यद यांना श्रीगोंदा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला जात आहे.

या पार्श्वभुमीवर दीपाली सय्यद यांनी रविवारी सायंकाळी नगरमध्ये मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आ.विनायक मेटे हेही उपस्थित होते. तसेच या बैठकीला सर्वपक्षिय कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यामध्ये मनसेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अनिता दिघे, काँग्रेसच्या सविता मोरे, शुभांगी देशमुख, माधवी दांगट, मनसेचे अनिकेत पुरोहित, डॉ.प्रदीप, संदीप थोरात, युवराज गुंड, लालासाहेब जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपा गोटात चिंता
सध्या युतीच्या जागा वाटपात श्रीगोंदा मतदारसंघ भाजपाकडे आहे. या जागेवर माजीमंत्री बबनराव पाचपुते इच्छुक असून त्यांनी व्यूहरचनाही केली आहे. पण घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाने दावा सांगितल्याने पाचपुते समर्थकांत चिंता व्यक्त केली जात आहे. हा मतदारसंघ भाजपाकडेच ठेवावा असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरणार असल्याचा पाचपुते समर्थकांचा सूर आहे.

या बैठकीत सध्या युतीच्या जागा वाटपात भाजपाकडे असलेला श्रीगोंदा मतदार संघ युतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाकडे घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. तसेच यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मतदार संघात दीपाली सय्यद यांचे समर्थक तसेच पक्षाची ताकद कशी आहे, साकळाई योजनेच्या मंजुरीसाठी दीपाली सय्यद या प्रत्येक गावा-गावांत पोहोचलेल्या आहेत. याबाबी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत हा मतदार संघ शिवसंग्राम पक्षाला घेण्याचा तसेच पक्षाकडून दीपाली सय्यद यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!