नगराध्यक्षा कोण? आज निर्णय

0
श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा व नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत मतदारांंच्या अशा रांगा लागल्या होत्या.

श्रीगोंदा पालिकेसाठी 83.98 टक्के मतदान 

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)- रविवार 27 जानेवारी रोजी श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीसाठी 23604ं मतदारापैकी 19822ं (83.98 टक्के) मतदारानी हक्क बजावला. यामध्ये 12214 पुरुष मतदारापैकी 10336 आणि 11388 महिला मतदारांपैकी 9486 जणांनी मतदान केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली. दरम्यान, श्रीगोंदा पालिकेच्या कम्युनिटी हॉल पंतनगर येथे ंआज सोमवार दि. 28 जानेवारी रोजी मतमोजणी होत लोकनियुक्त नगराध्यक्षपदी कोण बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

दरम्यान, दुपारपर्यंत याबाबचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. श्रीगोंदा नगरपालिकेच्या 19 जागांसाठी 9 प्रभागांत 71 उमेदवार रिंगणात होते. तर थेट जनतेमधून होणार्‍या नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार रिंगणात उतरले होते. 32 केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती.
नगराध्यक्ष पदासाठी आघाडीच्या शुभांगी मनोहर पोटे उमेदवार आहेत तर भाजपाने सुनीता शिंदे याना उमेदवारी दिली होती. संभाजी बिग्रेडने देखील उमेदवार दिला होता. नगरसेवक पदासाठी 71 उमेदवार रिंगणात होते.

भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी यांच्यात लढत असली तरी शिवसेना, बसपा, संभाजी बिग्रेडसह अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाच्यावतीने जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यानी प्रचार केला होता. आघाडीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सभा घेतल्या होत्या. या सभेत अनेक आरोप-प्रत्यारोप

झाले असले तरी निवडणूक मात्र कोणतेही गालबोट न लागला शांततेत पार पडले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावर्षी 83.98 टक्के मतदान झाले असल्यामुळे कोणता उमेदवार विजयी होईल याचा अंदाज लावणे अवघड आहे.

LEAVE A REPLY

*