Type to search

Breaking News मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९ सार्वमत

मतदान झालेली मतपत्रिका केली व्हायरल; गोपनियतेचा भंग

Share

श्रीगोंदा येथे बँक अधिकार्‍याविरूद्ध गुन्हा दाखल

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – श्रीगोंदा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून मतपत्रिका टपालाने मागवून त्यावर मतदान करून बंद लिफाफ्यात पाठविण्यापूर्वी त्याची अनाधिकाराने व्हिडिओ क्लीप करून ती सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी बँक अधिकार्‍याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून, संतोष छबुराव खंडागळे असे या अधिकार्‍याचे नाव आहे. पोस्टल मतदान करताना ते गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. मात्र येथे मततदान केल्यानंतर त्याची व्हिडिओ क्लीन व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सार्वजनिक करण्यात आली. प्रशांत घनश्याम शेलार यांच्या मोबाईलवर (9545451212) ही क्लीप आली असता त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ठेवून सार्वजनिक केली. त्यामुळे गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की श्रीगोंदा येथील पोस्टल मतपत्रिका नंबर 1293 वर कोणीतरी मतदान करून गोपनियतेचा भंग केला. त्यानंतर ही मतपत्रिका कोणाला दिली, याबाबत शोध घेतला असता ती संतोष छबुराव खंडागळे यांना दिल्याचे आढळून आले. ते सध्या पंढरपूर येथील युनियन बँक ऑफ इंडीया, शाखा लक्ष्मी रोड येथे कार्यरत आहेत. ते मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्यात निवडणुकीसाठी समजले. त्या इसमाने मतपत्रिकेवर मतदान करून बंद लिफाफ्यात पाठविण्यापूर्वी मतदान केल्याची व्हिडीओ क्लिप केली.

तसेच प्रशांत घनशाम शेलार यांना पाठविली असता त्याने ती त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस म्हणून ठेवल्याने गोपनियतेचा भंग झाला. याप्रकरणी निवडणूक भरारी पथकातील विकास पवार यांच्या फिर्यादीवरून संतोष खंडागळे याच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 128.136( एफ) (2)प्रमाणे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!