श्रीगोंदा : जम्मूतावी एक्सप्रेसमध्ये लूट

0

अहमदनगर : पुणे-जम्मूतावी एक्स्प्रेस रेल्वेवर श्रीगोंद्यानजीक काल (सोमवारी) रात्री दरोडा पडला. दरोडेखोरांनी सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लूटून नेला आहे. अहमदनगर रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-जम्मू तावी एक्सप्रेस सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातून निघाली. दौंड येथे बराच वेळ थांबल्यानंतर ती पुढे निघाली. काष्टी-श्रीगोंद्या दरम्यान अचानक रेल्वे थांबली. त्यावेळी रिर्झव्हेशन बोगीवर दगडफेक झाली. त्यानंतर अंधारातून आलेल्या तिघांनी प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने ओरबडण्यास सुरूवात केली. सोन्याची चैन, घड्याळ, मोबाईल असा सुमारे 1 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला. लुटीनंतर दरोडेखोर पसार झाले.
पुणे जिल्ह्यातील मुळशीचे आर.बी.दास व जळगावची वैशाली हेमराज हेगडे यांनी अहमदनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. हेगडे व दास हे दोघेही पुण्याहून रेल्वेत बसले होते. दास हे ग्वाल्हेरला जात होते. त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची चैन व घड्याळ तर हेगडे यांचा मोबाईल दरोडेखोरांनी लंपास केला. अहमदनगर रेल्वे पोलीस उपनिरीक्षक एस.डी.दिवटे अधिक तपास करत आहेत.

  • का थांबली रेल्वे
    काष्टी ते श्रीगोंदा दरम्यान थांबलेल्या रेल्वेवर हा दरोडा पडला. या दरम्यान ही रेल्वे का थांबली याची माहिती मागविणारे पत्र नगर रेल्वे पोलिसांनी श्रीगोंदा रेल्वे स्टेशन मास्तरांना लिहिले आहे.
  • काष्टी, श्रीगोंदा, बेलवंडी ‘सेन्सेटिव्ह’
    काष्टी, श्रीगोंदा व बेलवंडी हे तिन्ही रेल्वे स्टेशन रेल्वे पोलिसांच्या दप्तरी अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे आरपीएफ व रेल्वे पोलिसांचा या तिन्ही ठिकाणी रात्रीची स्वतंत्र गस्त असते. असे असूनही काष्टीजवळ झेलमवर दरोडा पडला.

LEAVE A REPLY

*