सेतू केंद्राविरोधात श्रीगोंद्यात उपोषण

0

सर्वसामान्यांची लूट थांबवा; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील सेतू केंद्रांमधून विद्यार्थ्यांची व सामान्य जनतेची लूट होत आहे. या लुटीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने उपोषण करण्यात आले. सेतू चालकांनी दाखल्याच्या पावत्या देण्याचे आदेश तहसीलदारांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यातील सेतू चालकांकडून विविध दाखले देण्यासाठी सर्वसामान्यांची आर्थिक लूट केली जाते. दाखले शासकीय नियमानुसार मिळावेत. दाखल्यांच्या पावत्या मिळाव्यात. दाखल्यांसाठीचे लागणारे शुल्क व कालावधी याचा बोर्ड प्रत्येक सेतू केंद्रात लावण्यात यावा या मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष विजय खेतमाळीस यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी तहसीलदार, सेतू चालक व आंदोलक यांच्यात बैठक होऊन यापुढे सेतू केंद्रामधून नियमाप्रमाणे शुल्क आकारून दर व दाखले द्यावयाचा कालावधी याचे फलक लावण्यात येतील असे आश्‍वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
मात्र तीन दिवसांत अंमलबजावणी झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष विशाल लगड यांनी दिला.
आंदोलनात राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, सागर वाकडे, राजाभाऊ लोखंडे, सावता हिरवे, राजेंद्र काकडे, अमोल कोहक, गोरख उंडे, निलेश गोरे, सोहम जगताप, सोमनाथ डुबल, निखील नितनवरे, बाळकृष्ण शिरसाठ, रवींद्र औटी, ऋषिकेश वाळके, गणेश खेतमाळीस आदी सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

*