श्रीगोंद्याच्या एरंंडोलीतील दाम्पत्याला स्वाईन फ्लू

0

येळपणेतील महिलेवर उपचार सुरू

लिंपणगाव (वार्ताहर)- पुणे, नाशिक जिल्ह्यात अनेकांना स्वाईन फ्लूची लागण झालेली असतानाच आता हा स्वाईन फ्लू नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात पोहचला आहे. एरंडोली येथील रोहिदास इथापे (वय 45) व त्यांच्या पत्नी रत्नमाला इथापे (36) यांना स्वाईन फ्लू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर तालुक्यातील येळपणे येथील एक रुग्ण स्वाईन फ्लूचा आढळून आल्याची माहिती हाती आली आहे.  रोहिदास इथापे यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळाली असून ते पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्वाईन फ्लूची लागण झालेली रूग्ण हे शिरूर तालुक्यातील सिमे शेजारी असल्याने स्वाईन फ्लुचा आधिक फैलाव होत असल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने बांधला आहे. एरंडोली व येळपणे येथील शेतकरी कुटूंबातील व्यक्तींना स्वाईन फ्लुने घेरल्याने तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने तात्काळ उपाययोजना म्हणून एरंडोली शाळेतील स्वाईन फ्लू बाबत जनजागृती करण्यात आली.

श्रीगोंद्याचे तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर यांच्याशी संपर्क साधला असता एरंडोली येथील शेतकरी कुटुंबातील इथापे दाम्पत्यांना स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याचे सांगितले. तर येळपणे येथील एका महिलेला स्वाईन फ्लूची लक्षणे असल्याचा प्राथमिक अहवाल असून तो आमच्यापर्यंत आलेला नाही.

LEAVE A REPLY

*