Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

श्रीगोंद्यात आजी माजी नगरसेवकांच्या गटांत हाणामारी

Share

पाच आरोपींना अटक

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- एक वर्षांपूर्वी श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत एकमेकांच्या समोर उभे असलेले विद्यमान भाजपा नगरसेविकेचे पती सुनील वाळके व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक फक्कड मोटे याच्या समर्थकांत झालेल्या वादाचे रूपांतर दोन गटांमध्ये तुफान हाणामारीत झाले. बुधवारी रात्री उशिरा याबाबत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून दोन्ही गुन्ह्यांत पाच आरोपींना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले आहे.

माजी नगरसेवक फक्कड मोटे आणि विद्यमान भाजप नगरसेविकेचे पती सुनील वाळके याच्या गटांमध्ये मागील नगरपालिका निवडणुकीच्या कारणावरून वाद झाला. यात दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माजी नगरसेवक फक्कड मोटे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून या दोन गटांमध्ये धुसफुस सुरू होती. गेल्या 27 रोजी संध्याकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शनिचौक येथे किरकोळ बाचाबाची झाली होती या कारणावरून पुन्हा दोन गट एकमेकांच्या समोर आले. त्यांच्यात तुफान मारामारी होऊन परस्परविरोधी तक्रारी झाल्या आहेत. पहिल्या फिर्यादीत फक्कड शंकर मोटे वय-58 वर्ष धंदा शेती रा. गणेशनगर श्रीगोंदा यांनी म्हटले आहे, की 27/08/2019 रोजी रात्री 10.30 वाच्या सुमारास चिंध्याई मंदिराजवळ रोडवर आरोपी सुनील वाळके, दिलीप वाबळे, सुरेश संभाजी शेटे, सागर संजय मखरे, संतोष वाबळे, हरी वाळुंज, सचिन वाळके, परसराम जाधव, मंगेश वाळके सर्व रा. मखरेवाडी ता. श्रीगोंदा यांनी जमाव जमवून फक्कड मोटे, संदीप मोटे, अनिल मोटे, नागेश मोटे, यांना शिवीगाळ करून तलवार, गज, लाकडीदांडका, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद दाखल केली आहे.

तर दुसर्‍या फिर्यादीत फिर्यादी नगरसेवक सुनील भगवंत वाळके यांनी म्हटले आहे, चिंध्याई मंदिराजवळ रोडवर आरोपी संदीप फक्कड मोटे, फक्कड शंकर मोटे, अनिल बाळू मोटे, बाळू शंकर मोटे, नागेश पोपट मोटे, विठ्ठल नारायण झुंजरूक व इतर 10 ते 15 लोक सर्व रा. मखरेवाडी ता. श्रीगोंदा यांनी जमाव जमवून सुनील वाळके, दिलीप वाबळे, संतोष वाबळे यांना शिवीगाळ करून तलवारीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही बाजूंनी रात्री उशिरा गुन्हे दाखल झाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!