Type to search

मुख्य बातम्या सार्वमत

ऊस बिलांसाठी आंदोलन : श्रीगोंद्यात आजी-माजी आमदारांच्या दारात पेटली चूल!

Share

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी)-  तालुक्यातील कुकडी व साईकृपा (हिरडगाव) या दोन्ही साखर कारखान्यांकडे श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तसेच अन्य तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची बिले थकीत आहेत. या बिलांसाठी संभाजी ब्रिगेडने माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे माऊली निवास व आमदार राहुल जगताप यांच्या सावली बंगल्यासमोर सोमवारी बेमुदत ठिय्या आणि चूल पेटवून आंदोलन सुरू केले आहे. शहरात दोन्ही आजी माजी आमदारांच्या घरासमोरील हे आंदोलन चर्चेचा विषय झाले आहे.

दुष्काळ व नापीकी यांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थ्यी, शेतीसाठी व दैनंदिन खर्चासाठी शेतकर्‍यांना आर्थिक गरज आहे. दोन्ही कारखान्याना ऊस दिला. ऊसाची बिले अनेक शेतकर्‍यांना मिळाली नाही. हिरडगाव कारखान्याकडे काही वाहतुकदारांची बिले अडकली आहेत. ही बिले मिळावी यासाठी आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. त्यानुसार सोमवारी आंदोलनाला सुरूवात झाली. पाठपुरावा करूनही बिले मिळत नसल्याने उसउत्पादक शेतकरी नाराज आहेत.


रक्कम लवकरच देणार
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा 2014 पासून साईकृपा शुगर अँड अलाईड लि. या कारखान्याच्या कोणत्याही पदावर नाहीत. यामुळे त्यांच्या माऊली निवासस्थानी आंदोलन करणे योग्य नाही, असे कारखाना प्रशासनाने म्हटले आहे. थकीत रक्कम लवकरच देणार असल्याचे कारखान्याने तहसिलदारांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!