Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीगोंद्यामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; ब्रॅण्डेड कपड्यासह मोबाईलही पळविले

Share

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – शहरातील कौशल्यादेवी इंग्लिश शाळेचे कार्यालय फोडून एक लॅपटॉप, माईकसह इतर साहित्य चोरी केल्यानंतर झेंडा चौकात असलेले गायत्री मोबाईल शॉपी, अजय रेडीमेड या कापड दुकानाचे शटर उचकटत ब्रॅण्डेड कंपनीचे कपडे चोरी करून एकूण पन्नास हजारांच्या आसपास मुद्देमाल लंपास केला आहे. तसेच मोबाईल शॉपी मधील मोबाईलही चोरले आहे.

22 ऑक्टोबर रोजी रात्री पडत असलेला रिमझिम पाऊस आणि त्यांनतर काही काळ गेलेली लाईट याचा फायदा घेत चोरट्यांची डल्ला मारला यात अजय जीन्स गँलेरी, कटारिया कलेक्शन, गायत्री मोबाईल शॉपी, आनंद मेडिकल या दुकानांतून एकूण 43 हजार 300 रुपयांचे साहित्य व रक्कम चोरी गेली आहे. याबाबात प्रतिक भाऊसाहेब घाटे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!