Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीगोंदा : अनुराधा नागवडे यांची माघार

Share

श्रीगोंदा | प्रतिनिधी

मतदार संघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या महिला काँगेसच्या राज्याच्या नेत्या तसेच जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

दोन दिवसांपूर्वी नागवडे समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यात नागवडे चे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी खासदारांच्या उपस्थितीत बोलताना मुख्यमंत्री यांनी मागण्या मान्य केल्या तर अर्ज माघारी घेऊ असे जाहीर केले होते.

त्यात नागवडे कारखाण्यात अन्य कुणाचा हस्तक्षेप होणार नाही तसेच पुढील विधानसभा निवडणुकीच्या शब्दावर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आल्याचे नागवडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

नागवडे परिवार आधी भाजपच्या संपर्कात होते. त्यांनी भाजपचे  तिकिट मिळवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना तिकिट मिळाले नाही. यांनतर त्यांनी आघाडी ऐवजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज माघारीच्या दिवशी अनुराधा नागवडे यांनी आपला अर्ज मागे घेतला यासाठी खासदार विखे याची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे बोलले जात आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!