श्री श्री रवी शंकर यांच्या ईशान्य भेटीपूर्वीच शांतीचे वातावरण तयार

0

गुवाहाटी :  जागतिक कीर्तीचे मानवतावादी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रवी शंकर मंगळवारी गुवाहाटीला भेट देत आहेत. ज्या भेटीमुळे भारताच्या ईशान्य भागात शांती प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने दूरगामी परिणाम होतील.

 या भेटी दरम्यान गुरुदेव अनेक सार्वजनिक आणि वैयक्तिक कार्यक्रमांना उपस्थित रहातील. या भागातील समस्यांना अहिंसेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने सामोरे जाण्यासाठी एकत्रितपणे मार्ग काढण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांची ते भेट घेतील. त्याचाच एक भाग म्हणून या भागातील नेते आणि विचारवंत यांच्या सभेत मुख्य व्याख्याते म्हणून उपस्थित रहातील.

 ‘स्ट्रेन्थ इन डायव्हरसिटी’ (विविधतेतील सामर्थ्य) असे नाव असलेली ईशान्येकडील स्थानिक लोकांची समविचारी आणि मान्यवर लोकांनी आणि या भातील गटांनी मिळून आयोजित केलेली ही प्रभावी परिषद आहे.

या कार्यक्रमात सर्व स्तरातील नेते एकत्र येतील ज्यात पूर्वी शस्त्र हाती असलेले लोकही एका व्यासपीठावर येऊन चर्चा करतील आणि शांती प्रक्रियेतील संबंधित अनेक लोकांमधला दुवा बनतील आणि कमी झालेला विश्वास संपादन करतील.

 अनेक माजी भूमिगत नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेतील गुरुदेवांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्यात या कार्यक्रमाचे आयोजक असलेले युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामचे (ULFA) जनरल सेक्रेटरी, अनुप चेतीया तसेच त्रिपुरा नॅशनल व्होलेंटियर्सचे बिजोय कुमार ह्र्गख्वाल आणि डीमा हलाम या आसाममधील अतिरेकी संघटनेचे दिलीप नुनिसा, ज्यांनी २०१३ मध्ये शरणागती पत्करली यांचा समावेश आहे.

संयोजकांबरोबरच नागालंड मधील अनेक नेते ज्यात NSCN(IM) चे माजी आर्मी चीफ, ले. जनरल व्ही एस अतेम आणि Wangtin Naga of NSCN(R) तसेच मणिपूरचे सिव्हील सोसायटीचे नेते, प्रेसिडेंट ऑफ युनायटेड कमिटी ऑफ मणिपूर (UCM) चे एलांग्बाम जॉन्सन आणि ऑल मणिपूर युनायटेड क्लबस ऑर्गनायझेशन चे देबानादा शर्मा यांची उपस्थिती अपेक्षित असणार आहे.

अनुप चेतीया म्हणाले, “आम्ही गुरुदेवांना या सभेत भाषण करण्यासाठी आमंत्रण दिले आहे कारण व्यक्ती आणि समाज यांच्यातील जुने चिघळलेले वाद, संघर्ष प्रमाणे, सामंजस्याने, मानवी मूल्ये वापरून आणि करुणेने सोडविण्यासाठी ते जगात प्रसिध्द आहेत.”

 

 

 

 

संस्थे तर्फे अनेक संघर्ष निवारणाच्या कार्यात पुढाकार घेणारे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संजय कुमार म्हणतात, “पूर्वी हिंसक कृत्ये करणाऱ्या नेत्यांना शांततापूर्ण मार्गाने एकत्र आणण्याच्या गुरुदेवांच्या विचारामुळे ही परिषद म्हणजे या प्रदेशात शांतता प्रस्थापित करणारी एक ऐतिहासिक घटना आहे.”

या भागात शांताता प्रस्थापित व्हावी म्हणून गुरुजी सतत प्रयत्न करीत आहेत. आणि नुकतेच मणिपूर मधील ६८ अतिरेक्यांनी शरणागती पत्करली त्यातही गुरुदेवांचा मोठा सहभाग होता.

शांततेसाठी सर्वंकष मार्ग अवलंबणारे गुरुदेव, ‘आधिभौतिक शांती संमेलान’ या आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या खास कार्यक्रमातही उपस्थित राहणार आहेत. या क्षेत्रात नुकत्याच आलेल्या नैसर्गिक आपत्ती नंतर वातावरणात शांती आणि सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रार्थना करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला. आसाम मधील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने पूरग्रस्तांसाठी केलेली मदत दुर्गम आणि पुरामुळे खूपच परिस्थिती झालेल्या ७०,००० लोकांपर्यंत पोहोचली आहे. गुरुदेव या कार्याचाही आढावा घेणार आहेत.

आसाममधील कार्यक्रमानंतर गुरुदेव अरुणाचल प्रदेश ळा भेट देणार आहेत. तेथे भारत चीन सीमेवरील तवांग या ठिकाणी ‘मैत्रेय दिवास’ या उत्सवात सहभागी होणार आहेत. अरुणाचल सरकारने आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित रहाणार आहेत. ज्यात तेथील मंत्री, MLA आणि मान्यवरांच्या  समोर व्याख्यान होणार आहे.

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

*