Thursday, May 2, 2024
Homeनगररामनवमी उत्सवात साईंच्या दानपेटीत एवढे कोटी जमा

रामनवमी उत्सवात साईंच्या दानपेटीत एवढे कोटी जमा

शिर्डी |प्रतिनिधी|Shirdi

श्री साईबाबा संस्थानच्यावतीने (Shri Sai Baba) बुधवार दि. 29 मार्च ते शुक्रवार 31 मार्च 2023 याकालावधीत साजरा करण्यात आलेल्या श्री रामनवमी (Shri Ram Navami) उत्सवात सुमारे 2 लाख साईभक्तांनी (Sai Devotee) श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव (CEO Rahul Jadhav) यांनी दिली.

- Advertisement -

स्पर्धा परीक्षा केंद्राच्या पुनरुज्जीवनासाठी 55 लाख

श्री.जाधव म्हणाले, रामनवमी उत्सव (Shri Ram Navami Festival) मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला असून या उत्सव काळात साईभक्तांकडून श्री साईबाबा संस्थानला विविध माध्यमातून भरभरुन देणगी प्राप्त झाली आहे. यामध्ये दानपेटीतून 1 कोटी 81 लाख 82 हजार 136 रुपये, देणगी काउंटरव्दारे 76 लाख 18 हजार 143, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक/डिडी, मनी ऑडर आदींव्दारे 1 कोटी 41 लाख 52 हजार 812 रुपये देणगी रक्कम स्वरुपात प्राप्त झालेली आहे. तसेच सोने 171.150 ग्रॅम (रुपये 8 लाख 64 हजार 723) व चांदी 2713 ग्रॅम (रुपये 1 लाख 21 हजार 813) देणगी प्राप्त झालेली आहे. अशाप्रकारे विविध मार्गाने एकुण 4 कोटी 9 लाख 39 हजार 627 रुपये देणगी (Donation) प्राप्त झाली आहे.

ग्रामपंचायतींना 692, पालिकांना 191 कोटींचा निधी

तसेच या व्यतिरिक्त उत्सव काळात सशुल्क व ऑनलाईन पासेसद्वारे एकुण 61 लाख 43 हजार 800 रुपये देणगी प्राप्त झाली. तसेच श्री साई प्रसादालयात उत्सव काळात 1,85,413 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर 32,530 साईभक्तांनी (Sai Devotee) अन्नपाकिटांचा लाभ घेतला. याबरोबरच 32,500 तीन नगाचे लाडु पाकीटे व 3,39,590 एक नगाचे लाडु पाकिटांची विक्री करण्यात आली असून याद्वारे 42 लाख 8 हजार 400 रुपये प्राप्त झाले आहे. 1,16,000 मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे दर्शन रांगेतून साईभक्तांना (Sai Devotee) वाटप करण्यात आले.

विखे, तांबे यांच्याकडून जय श्रीरामचा नारा संगमनेरात रामनवमीनिमित्त भव्य मिरवणूक

तसेच श्री रामनवमी उत्सव कालावधीत साईआश्रम भक्तनिवास, व्दारावती भक्तनिवास, साई धर्मशाळा, श्री साईबाबा भक्तनिवास्थान (500 रुम) व साईप्रसाद निवास आदी निवास्थानांद्वारे 43,424 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली. अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात 5,954 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली. अशी एकुण 49,378 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आलेली असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या