Thursday, April 25, 2024
Homeनाशिकश्री माऊली मल्टीस्टेटच्या विष्णू भागवतसह संचालकांवर गुन्हा; फसव्या योजनांचे आमिष दाखवत कोट्यवधीचा...

श्री माऊली मल्टीस्टेटच्या विष्णू भागवतसह संचालकांवर गुन्हा; फसव्या योजनांचे आमिष दाखवत कोट्यवधीचा अपहार

नाशिक | प्रतिनिधी

श्री माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी प्रा. लि व संकल्पसिद्धी प्रोडक्ट प्रा. लि. कंपनीचे संचालक विष्णू भागवत याच्यासह इतर संचालकांवर मुंबई नाका पोलिसांत अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि दाखल फिर्यादीनुसार ऑक्टोबर २०१५ ते जानेवारी २०१९ याकाळात श्री माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप. सोसायटी प्रा. लि व संकल्पसिद्धी प्रोडक्ट प्रा. लि. मध्ये गुंतवणूक म्हणून ठेवलेल्या रकमेच्या बदल्यात जादा परताव्याचे आमिष   दाखवत जानेवारी २०१९ मध्ये परतावा परत न करता कंपनीचे संचालक विष्णू भागवत यांनी या रकमेचा अपहार केला आहे. या फिर्यादीची एकूण ५३ लाख ४३ हजार १२० रुपयांची फसवणूक भागवत यांनी केली आहे.

त्यामुळे या कंपनीत आतापर्यंत एकूण ३ कोटी ८३ लाख ६८ हजार ३०८ रुपयांचा अपहार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.  तसेच भागवत याने संचालक असलेल्या उज्वलम अग्रो मल्टीस्टेट को. ऑप सोसायटीमधील ठेवीदारांनी सोसायटीत तेह्व म्हणून तेह्व्लेल्या हक्मेचा परतावा न करता ठेवीदारांना कोणत्याही प्रकारे माहिती न देतात तसेच कृषी मंत्रालायाची परवानगी न घेता उज्वलमच्या ठेवी परस्पर श्री. माऊली मल्टीस्टेटमध्ये वर्ग करून त्यांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच वरील कंपन्यांनी विविध योजनांच्या माध्यमांतून ग्राहकांकडून पैसे उकळवले आहेत.

यासोबतच संशयितांनी सर्वसाधारण ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारत ठेवी जमा करणाऱ्या एजंटसला १०० टक्के कर्ज मंजूर करून सोसायटी व कंपनीच्या नावे महागड्या रेंज रोव्हर, फोर्चुनर सारख्या महागड्या गाड्या खरेदी केल्या आहेत.

वरील कंपन्यांत मोठा अपहार झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर  नाशिक शहर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सात पथके तयार करण्यात आली. त्यांनी सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला होता. त्यानुसार शहर पोलिसांनी ठिकठिकाणी सापळे रचून जवळपास ३ कोटी ३३ लाख ०६ हजार ६०९ रुपयांच्या १० महागड्या गाड्या जप्त केल्या आहेत. उर्वरित गाड्यांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जमा केलेल्या गाड्यांमध्ये चार रेंज रोव्हर, तीन टोयाटो फोर्चुनर, एक ह्युंदाई क्रेटा, एक इनोव्हा, एक इंडीवेअर अशा महागड्या कारचा समावेश आहे.

दरम्यान, मुख्य संशयित विष्णू भागवत याचे एकूण २७ बँक खाती गोठविण्यात आली असून या खात्यांत १० लाखांची रक्कम आढळून आली आहे. यामुळे संशयिताच्या नावे असलेली माहिती प्राप्त करून मिळकती महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायदा १९९९ कलम ४ अन्वये सलग्न करण्यात आले आहे.

शहर पोलिसांचे आवाहन 

वरील कंपनीत गुंतवणूक केली असल्यास नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहन नाशिक शर पोलिसांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या