Photo Gallery : संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गणेश दर्शनासाठी उसळली गर्दी

0
नाशिक : आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे सकाळपासूनच शहरातील अनेक गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे.

नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील नवश्या गणपती, ढोल्या गणपती, सिद्धिविनायक गणपती मंदिरात भाविकांनी  मोठी गर्दी केली आहे.

रविवारची सुट्टी असल्यामुळे अनेक नाशिककरांनी आज याठिकाणी सुट्टी साजरी केली. नवश्या गणपतीजवळच असणाऱ्या सोमेश्वर मंदिरातदेखील आज सकाळी लक्षणीय गर्दी बघायला मिळाली.

अहमदनगरसाठी सध्या नाशिकमधील गंगापूर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे याठिकाणी नदीला पाणीही आहे. येथील प्रसिद्ध सोमेश्वर धबधब्यावर अनेक नाशिकरांनी हजेरी लावत आजच्या सुट्टीचा आनंद द्विगुणीत केला.

 

LEAVE A REPLY

*