तर ‘बागी ३’मध्ये हिच अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत

0
मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफच्या ‘बागी 3’ मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका कोण साकारणार? याचं उत्तर आता मिळालंय. ‘बागी 3’ मध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूरची वर्णी लागली आहे. ट्रेड ऍनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर पोस्ट करत ‘बागी 3’ सिनेमाच्या अभिनेत्रीच्या नावाची अधिकृत घोषणा केलीय.
‘बागी 2’ सिनेमात मुख्य भूमिकेत टायगर आणि दिशा पाटनी झळकले होते. 59 कोटी रुपयांचा बजेट असलेला ‘बागी 2’ सिनेमा 2018 मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता.

या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासाठी साजिद यांनी श्रद्धाच्याच नवावर शिक्कामोर्तब केला आहे. यापूर्वी सारा अली खान हिचं नाव ‘बागी ३’साठी चर्चेत होतं. ‘केदारनाथ’, ‘सिम्बा’ यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी सारा ‘बागी ३’मध्ये दिसेल अशा चर्चा काल-परवापर्यंत होत्या.

मात्र हे सारे तर्क-विर्तक खोडून काढत साजिद यांनी श्रद्धालाच पसंती दर्शवली आहे. ‘बागी ३’ हा चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे. अहमद खान ‘बागी 3’ चं दिग्दर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

*