Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिकच्या रुग्णांचा अहवाल मुंबईच्या लॅबमध्ये ‘पॉझिटीव्ह’ अन् पुण्याच्या लॅबमध्ये ‘निगेटीव्ह’

नाशिकच्या रुग्णांचा अहवाल मुंबईच्या लॅबमध्ये ‘पॉझिटीव्ह’ अन् पुण्याच्या लॅबमध्ये ‘निगेटीव्ह’

नाशिक । प्रतिनिधी

करोना संशयित रुग्णांच्या स्वॅब नमुना तपासणीस वेग यावा याकरिता केंद्र शासनाने खाजगी लॅब यांना रुग्णांचे नमुने तपासणीस परवानगी दिली आहे. असे असले तरी खाजगी लॅबच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला आहे. जुने नाशिक येथील रुग्णांचा अहवाल मुंबईस्थित लॅबकडुन पॉझिटीव्ह आल्यानंतर तीन दिवसात पुणे येथील सरकारी लॅबचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. या प्रकारामुळे खाजगी लॅबच्या अहवालाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

- Advertisement -

करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी केंद्र शासनाकडुन तात्काळ स्वॅब नमुना तपासणीला प्राधान्य देण्यासाठी देशातील काही खाजगी लॅबला नमुना तपासणीस मान्यता देण्यात आली आहे. परिणामी काही तासांत स्वॅब तपासणी होत असल्याने आणि तात्काळ येणार्‍या संशयितांच्या नमुन्यांचा अहवालामुळे प्रतिबंधास वेळ मिळत आहे.

असे असले तरी नाशिकच्या एका रुग्णांच्या नमुना तपासणीतून आता खाजगी लॅबच्या अहवालाच्या विश्वसार्हतेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. या रुग्णांने संपर्कातून आपल्याला करोना झाला असल्याच्या संशयातून नाशिकमधुन मुंबईस्थित एका खाजगी लॅबकडुन स्वॅब तपासणी करुन घेतल्यानंतर, याचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.

यामुळे घाबरलेला हा रुग्णाने स्वत:हून महापालिका रुग्णालयात दाखल झाला. यावेळी महापालिकेने या रुग्णांचा लगेच स्वॅब नमुना घेऊन पुणे येथील सरकारी लॅबला पाठविला असता आज (दि.17) हा अहवाल निगेटीव्ह आला. अशाप्रकारे गेल्या चार दिवसापासुन मोठ्या तणावात असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

खाजगी लॅबच्या अहवालामुळे संबंधीत रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असुन यानिमित्ताने खाजगी लॅबच्या तपासणी अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिक महापालिका प्रशासनाने या रुग्णांसाठी ते राहत असलेला भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर करीत याठिकाणी उपाय योजना सुरू केल्या आहे. परिणामी महापालिकेतील करोना रुग्णात भर पडली आहे. अशाप्रकारे या धक्कादायक प्रकारामुळे महापालिका यंत्रणा कामाला कामाला लागली.

- Advertisment -

ताज्या बातम्या