Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी १०० कोटी; लेखिका शोभा डेंचा विरोध

Share
मुंबई – नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात अडकणाऱ्या स्तंभलेखिका शोभा डे यांनी पुन्हा एकदा वाद ओढून घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शोभा डे यांनी विरोध दर्शवला आहे. आम्हाला स्मारकं नकोत तर शाळा आणि रुग्णालय हवी आहेत, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे आता यावरुन वाद निर्माण होण्याची दाट शक्यता असून, राज्य सरकार आणि शिवसेना यावर काय उत्तर देईल, याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीपर्यंत मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान असलेल्या दादर येथील हेरिटेज वास्तूत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होणार आहे. त्यासाठी महापौरांचं निवासस्थान राणी बागेतील एका बंगल्यात स्थलांतरित करण्यात आलं आहे. बुधवारी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दादर येथील प्रस्तावित स्मारकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. स्मारकासाठी राज्य मंत्रिमंडळानं १०० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. लेखिका शोभा डे यांनी सर्वसामान्यांच्या पैशाच्या या उधळपट्टीला जोरदार आक्षेप घेतला आहे.

‘आम्हाला आणखी स्मारकांची गरज नाही. आम्हाला शाळा आणि रुग्णालयं हवी आहेत. मला १०० कोटी रुपयांचं अनुदान द्या, एक नागरिक म्हणून लोकांच्या हितासाठी त्याचा कसा वापर करायचा हे मी दाखवून देते,’ असं आव्हानही त्यांनी सरकारला दिलं आहे. डे यांच्या या भूमिकेवर शिवसेना आणि राज्य सरकार नेमकी कशी प्रतिक्रिया देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!