Type to search

Featured नाशिक

सिन्नर पंचायत समितीच्या सभापतीपदी शोभा बर्के बिनविरोध

Share

सिन्नर:

पंचायत समितीच्या सभापती शोभा दिपक बर्के यांची, तर उपसभापती संग्राम शिवाजीराव कातकाडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समितीच्या सभागृहात तहसिलदार राहूल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती व उपसभापती निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभापती, उपसभापती निवडीच्या निर्धारित वेळेत सभापती पदासाठी बर्के यांचा तर उपसभापतीपदासाठी कातकाडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने कोताडे यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता असून बर्के व कातकाडे यांच्या निवडीची घोषणा होताच समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.

बैठकीसाठी जगन पा. भाबड, संगिता पावसे, रोहिणी कांगणे, सुनिता बर्डे, वेणूबाई डावरे, भगवान पथवे, विजय गडाख, रविंद्र पगार, तातू जगताप, सुवर्णा कांदळकर उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे यांच्या हस्ते बर्के व कातकाडे यांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी निवड प्रक्रियेकामी तहसिलदार कोताडे यांना सहाय्य केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!