शिवसेनचे कृषी अधिवेशन नाशिकला होणार

0

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा, समस्या व त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी दिर्घ व उपयोगी ठरणाऱ्या मार्गदर्शक उपाययोजना करण्यासाठी “शिवसेना कृषी अधिवेशन २०१७” नाशिक येथे घेण्यात यावे अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.

आज शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांनी नाशिक जिल्ह्यातील प्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या कृषी अधिवेशांनाच्या नियोजांच्या संदर्भात मार्गदर्शन केले व  नाशिक येथे शुक्रवार दिनांक १९ मे रोजी सकाळी ९ वाजता चोपडा सभागृह, गंगापूर रोड, नशिक येथे अधिवेशन घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

शिवसेना नाशिक महानगरच्यावतीने अधिवेशांच्या आयोजनाच्या संदर्भातील बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शालिमार येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी आमदार शिवराम झोले, ग्रामीण जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, प्रकश म्हस्के, माजी महापौर यतीन वाघ, नगरसेवक डी.जी. सूर्यवंशी, शाम साबळे, दिपक दातीर, देवानंद बिरारी, अजीम सैय्यद, पप्पू मराठे, हरिभाऊ गायकर, शशिकांत कोठुळे, मंगलाताई भास्कर, लोकेश गवळी, नितीन चिडे, मसूद गिलानी, निलेश मोरे, आदित्य बोरस्ते, महेश सोपे, पप्पू टिळे, उमेश चव्हाण, दिपक आरोटे, शंकर पांगरे, अमोल निमसे आदी उपस्थित होते.

या कृषी अधिवेशनाच्या आयोजनाचा मान नाशिक शिवसेनेला मिळाला असल्याने गंगापूर रोड वरील चोपडा बँक्वेट हॉल या सुसज्ज सभागृहात हे शिबीर सकाळी ९ ते दुपारी ४.३० या कालावधीत होणार असून उत्तर महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत.

निसर्गाचा कोप, दुष्काळ, कर्जाचा डोंगर या सर्वांना कंटाळून महाराष्ट्रातील शेतकरी हा आत्महत्या करण्यास्ताठी प्रवृत्त होत आहे आणि म्हणूनच शिवसेनेच्या या कृषी अधिवेशनाच्या माध्यमातून ही उपेक्षा संपवण्यास नक्कीच उपयोग होईल असा निरधार शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला असून या अधिवेशांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यावरील ठोस उपाययोजना व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती या विषयी मार्गदर्शन करणार आहेत.

मनपा निवडणुकीनंतर शिवसेनेचे महाराष्ट्रात प्रथमच अश्या प्रकारच्या कृषी अधिवेशांचे आयोजन होत आहे. या अधिवेशनास उत्तर महाराष्ट्रातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याने आयोजक म्हणून त्यांची जबाबदारी शिवसेना नाशिक महानगरची असल्याने अधिवेशनाला येणाऱ्या लोकांसाठी वाहन व्यवस्था, निवास व्यवस्था, स्वागत कक्ष, नोंदणी कक्ष, खानपान व्यवस्था, अधिवेशनाची प्रसिद्धी, आसन व्यवस्था या सर्व बाबींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

या अधिवेशनाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी १७ मे रोजी शिवसेना जेष्ठ नेते नामदार सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख आमदार अजय चौधरी नाशिक येथे येणार असल्याची माहिती महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

LEAVE A REPLY

*