शिवसेनेचे जिल्हा बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन

0

तात्काळ कर्जमाफी न दिल्यास ग्रामीण भागातील शाखांपुढे आंदोलनाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर नगर जिल्हा बँकेने किती शेतकर्‍यांचे दीड लाखांच्या आतील कर्जमाफ केले. कर्जमाफ केलेल्या शेतकर्‍यांची यादी जिल्हा बँकेच्या मुख्यालयासह ग्रामीण भागातील शाखांमध्ये नोटीस बोर्डवर जाहीर करावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हा बँकेच्या मुख्यालया समोर शिवसेनेच्यावतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. आंदोलनात  मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले.

राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केलेली आहे. या कर्जमाफीचा जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना लाभ मिळाला. किती शेतकरी दीड लाखांचे कर्जमुक्ती मिळाली याची माहिती मिळावी शिवसेनेच्यावतीने जिल्हा बँकेच्या समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अधिकारी आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले. त्यावेळी शशिकांत गाडे यांनी बँकेने किती शेतकर्‍यांचे कर्ज माफ केली याची माहिती द्या आणि नसेल माफ केले तरी तसे सांगा, अशी मागणी केली.

त्यावर बँकेचे अधिकारी भिंगारकर आणि भोसले यांनी दहा मिनिटांचा कालावधी मागावून घेत पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्याकडे चर्चेसाठी गेले. दरम्यान, बँकेने कर्जमाफी केलेल्या शेतकर्‍यांची माहिती न दिल्यास ग्रामीण भागातील बँकेच्या सर्व शाखांसमोर आंदोलन करण्याचा इशार यावेळी गाडे आणि जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला.

आंदोलनात घनश्याम शेलार, महापौर सुरेखा कदम, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पारनेर तालुकाध्यक्ष नीलेश लंके, संजय आनंदकर, रफिक शेख, भरत लोहकरे, विभिष्ण गायकवाड, दिलीप सातपुते, भंगवत मुंगसे, राजेंद्र देवकर, विजय ढोकणे, दिंगबर ढवण, भगवान फुलसौंदर, नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, नगरसेवक योगिराज गाडे आदी सहभागी झाले.

………….
लेखापरिक्षकांच्या तपासणीनंतर कर्जमाफीची कार्यवाही
दुपारी उशीरा आंदोलनकर्ते आणि बँकेच्या अधिकारी यांच्यात चर्चा सुरू होती. कर्जमाफीसंदर्भात सेनेच्या पदाधिकार्‍यांना बँकेकडून लेखीची मागणी करण्यात आली. तर बँकेकडून कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, चर्चेतून मार्ग निघत नव्हता. बँकेच्या अधिकार्‍यांनी बँकेेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांच्याशी आंदोलनकर्त्यांचे बोलणे करून दिले. त्यानंतर या चर्चेत जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार बादशेडे हे देखील सभागी झाले. यावेळी गाडे, खेवरे, विक्रम राठोड, शेलार, कार्ले, झोडगे, लंके आदी उपस्थित होते. अखेर जिल्हा बँकेने लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना दिले. यात अद्याप कर्जमाफीच्या प्रस्ताव तपासण्यात येत आहेत. शासकीय लेखा परीक्षकाकडून त्याची तपासणी झाल्यावर कर्जमाफीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

*