Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिवसेना इच्छुकांच्या 18ला मुलाखती

Share

मुलाखतीस कोण कोण जाणार? उत्सुकता

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजप, राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेतही विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईत होणार्‍या या मुलाखतींसाठी नगरच्या इच्छुकांना 18 तारीख देण्यात आली आहे. नगरमध्ये शिवसेनेत प्रथमच उमेदवारीसाठी स्पर्धा निर्माण झाल्याने मुलाखतीला कोण कोण जाणार, याबाबत उत्सुकता आहे.हीच स्थिती जिल्ह्यातील इतर मतदारसंघांची आहे.

10 ते 20 सप्टेंबर या काळात मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. शिवसेना नेत्यांचे पॅनल या मुलाखती घेणार आहे. 18 सप्टेंबरला नगरसह नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगावमधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. नगर शहर मतदारसंघातून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्याबरोबरच नगरसेवक अनिल शिंदे यांच्या पत्नी व माजी महापौर शीला शिंदे, माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनीही उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे. राठोड हे मुलाखतीला जाणारच आहेत, पण शिंदे, कदम यांच्याबरोबरीने आणखी कोण मुलाखत देणार याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

शहरातील शिवसेना म्हणजेच राठोड, असे मानले जात होते. त्यांच्या नावाला पक्षातून कधीच विरोध झाला नाही किंवा त्यांना कोण स्पर्धकही उभा राहिला नाही. यावेळी मात्र राठोड यांचे समर्थक असलेलेच ज्येष्ठ नगरसेवक अऩिल शिंदे यांनी पत्नीसाठी आणि दुसरे समर्थक असलेले माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी स्वतःसाठी उमेदवारी मागितली आहे. राठोड यांना स्पर्धक निर्माण झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

पक्षांतर्गत स्पर्धा वाढत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप हे देखील शिवसेनेत येणार असल्याची चर्चा आहे. तसेच भाजपचा एक मोठा गट राठोड यांच्या विरोधात असून त्यांच्या उमेदवारीला या गटाने प्रखर विरोध केला आहे. एकतर जागा भाजपला द्या किंवा युती होऊन जागा शिवसेनेकडे गेल्यास राठोड उमेदवार चालणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका या गटाने घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर या मुलाखती होत आहेत.

सेना-भाजपात जागांची अदलाबदल
अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी शिवसेना आणि भाजपा नेते रणनिती आखत आहेत. दोन्ही पक्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून इनकमिंग सुरू आहे. नव्याने भरती केलेल्या नेत्यांना मतदारसंघ उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही पक्ष तडजोड करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राज्यात सेना-भाजपात किमान 20-25 जागांची अदलाबदल होणार आहे. यात नगर जिल्ह्यातील अकोेले, शिर्डी तसेच अन्य मतदारसंघांचा समावेश आहे. दोन्ही पक्षांत झालेले इनकमिंग आणि मागील निवडणुकीत मिळालेल्या मतदानाची टक्केवारी या निकषावर ही अदलाबदली होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!