Type to search

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 जून रोजी अयोध्येचा दौरा करणार

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 जून रोजी अयोध्येचा दौरा करणार

Share

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला उद्धव ठाकरे16 जून रोजी भेट देणार आहेत.

उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही राहणार आहेत. सहा महिन्यांपूर्वीच म्हणजे लोकसभा निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता.

त्यावेळी राम मंदिराच्या बांधकामाचा मुद्दा उचलत उद्धव यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले होते. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत.

राम मंदिर बांधण्याची तारीख आम्हाला हवी आहे, आम्हाला राम मंदिराच्या उभारणीची तारीख कळवा, नंतरच इतर विषयांवर बोलू, असे म्हणत उद्धव यांनी नोव्हेंबरमधील अयोध्या सभेत हा मुद्दा घेत युतीचा विषय लांबणीवर टाकला होता.

दरम्यान, यानंतर युती झाली असली तरी आता शिवसेनेच्या दौऱ्यात शिवसेनेकडून पुन्हा राम मंदिर मुद्द्यावर काय पावित्रा घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!