Thursday, May 2, 2024
Homeनगरशिंदे जिल्हाप्रमुख, जाधव दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख

शिंदे जिल्हाप्रमुख, जाधव दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला समर्थन देणार्‍या शिवसेना नगरसेवक व पदाधिकार्‍यांना शिंदे गटाकडून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी नगरसेवक सचिन जाधव यांची दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

दिलीप सातपुते यांची नगर शहर प्रमुख व सुनील लालबोंद्रे यांची भिंगार शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पारनेर तालुका प्रमुख म्हणून विकास रोहोकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरसेवक सुभाष लोंढे यांना उपजिल्हा प्रमुख म्हणून संधी देण्यात आली आहे. राज्यात शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर नगर शहरातून सर्वप्रथम नगरसेवक शिंदे, माजी नगरसेवक जाधव, माजी शहरप्रमुख सातपुते, नगरसेवक लोंढे यांनी शिंदे गटाला समर्थन दिले.

या सर्वांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार नगर जिल्हा व शहरात कार्यकारिणीवर पदे देण्यात आली आहेत. मंगळवारी अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून नगर शहर व जिल्ह्यातील काही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

यात नगर शहर प्रमुखपदी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सातपुते यांना संधी देण्यात आली आहे. बायोडिझेल प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेने सातपुते यांना पदावरून बाजूला केले होते. तेव्हापासूनच ते शिवसेनेवर नाराज होते. शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर त्यांना आता शिंदे गटाचे शहर प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या