Type to search

मुख्य बातम्या हिट-चाट

‘ठाकरे’शिवाय कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, शिवसेनेचा इशारा

Share
मुंबई : बहुचर्चित ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता त्यावर चर्चादेखील झडू लागल्या आहेत. येत्या २५ जानेवारी रोजी ‘ठाकरे’ चित्रपटाशिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला आहे.

बाळा लोकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे हा इशारा दिला आहे. तर एका माध्यामाशी बोलताना लोकरे म्हणाले की, २५ जानेवारीला ठाकरे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे, यादिवशी इतर कोणताही चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. जर कोणी चित्रपट प्रदर्शित केलाच तर त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ.

लोकरे यांच्या या इशाऱ्यानंतर आता ‘मणिकर्णिका’च्या अडचणीत आणखी एक वाढ झाली आहे. कंगनाची मुख्य भूमिका असलेला ‘मणिकर्णिका-द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटही २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय इम्रान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला ‘चीट इंडिया’ चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहे.

तर, ठाकरे चित्रपट हा मराठी आणि हिंदीत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे शिवसेना चित्रपट सेनेच्या इशाऱ्यानंतर आता बॉलिवूड चित्रपट माघार घेणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर आता या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेत काही बदल होतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!