Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

न्यायव्यवस्थेला दंडवत, बाळासाहेबांची आज आठवण येत आहे – उद्धव ठाकरे

Share

मुंबई : प्रतिनिधी 

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले अनेक वर्षांचा लढा संपला याचं मला समाधान आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना निश्चितच गर्व वाटला असता. आजच्या निकालाच्या दिवशी बाळासाहेबांची आठवण देशभरातील नागरिकांना येणे स्वाभाविक आहे.

कारण तो काळ असा होता जेव्हा या देशात लोक मी हिंदू आहे, हे म्हणायलाही घाबरत होते. तेव्हा बाळासाहेबांनीच सर्वांना गर्व से कहो हम हिंदू है, हा विश्वास दिला होता.

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद- LIVE

Posted by ShivSena on Saturday, 9 November 2019

ठाकरे म्हणाले की, मला समाधान आहे वर्षभराच्या आतच निकाल आला आहे. गतवर्षी 24 नोव्हेंबरला मी आणि माझे शिवसैनिक अयोध्येला गेलो होतो. तेथे जाण्यापूर्वी मी शिवरायांच्या जन्मभूमीतील शिवनेरीतील मूठभर माती अयोध्येला सोबत नेली होती.

महाराष्ट्राची ही चमत्कारिक माती तेथे नेल्याने नक्कीच हा अनेक वर्षांचा लढा लवकरच सुटेल असा मला विश्वास होता. आज 9 नोव्हेंबर आहे. वर्षभराच्या आतच माझा विश्वास सार्थ ठरला.

आम्ही सर्व शिवसैनिकांनी तेव्हा शरयु नदीच्या किनारी आरती केली होती. यामुळे आता दोन-तीन दिवसांतच मी शिवनेरीवर शिवरायांना वंदन करायला जाणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!