शिवसेना पक्षप्रमुखांच्या पुणतांबा दौर्‍याची तयारी

0
पुणतांबा (वार्ताहर) – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 25 जून रोजी पुणतांबा येथे येत असून त्यांच्या दौर्‍याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पुणतांब्यातील शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी पुणतांब्याला येण्याचे आश्वासन दिले होते. रविवारी 25 जून रोजी ठाकरे यांचा दौरा निश्‍चित झाला आहे.
शनिवारी दुपारी 3 वाजता सेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे पुणतांब्यात आले व त्यांनी ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी जागेची पाहणी केली. यावेळी सुहास वहाडणे, धनंजय जाधव, नाना बावके, भास्कर नवले, भास्कर मोटकर, अनिल नळे, सुधाकर जाधव, मुन्ना नवले, चंद्रकांत वाटेकर, रावसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी पुणतांब्यातील जिल्हा परिषद शाळा, कोपरगाव रस्त्यालगतचे मैदान तसेच रुरल हायस्कूलच्या क्रीडांगणाची पाहणी करण्यात आली. रुरल हायस्कूलच्या क्रीडांगणाबाबत एकमत झाले आहे. चांगदेव महाराज मंदिर परिसरात असलेल्या प्रागंणाचाही पर्याय डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे.
दौर्‍याबाबतच्या नियोजनावरही चर्चा झाली. शेतकरी संपाची कल्पना सर्वात अगोदर पुणतांबा गावातील शेतकर्‍यांनी पुढे आणली व शेतकर्‍यांच्या आंदोलनाची शासनाला दखलही घ्यावी लागली. शेतकर्‍यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी ठाकरे पुणतांब्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*