शेतकऱ्याला त्रास देणाऱ्यांना शिवसेना दाखवणार इंगा

धुळ्यातील सभेत उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश

0
धुळे : नोटबंदीचा फटका शेतकरी वर्गाला जास्त बसला आहे. शेतकऱ्यांना कुणी बँक कर्मचाऱ्यांनी त्रास दिला तर शिवसेनेचा इंगा दाखवा. असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आज देत मित्रपक्ष भाजप आणि विरोधी पक्षातील नेत्यांवर त्यांनी चौफेर टीका केली.  

कर्जमाफी देताना सरकारने जाचक अटी लादल्या असून शेतकर्‍यांची दिशाभूल केली आहे. यामुळे शेतकर्‍यांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आज धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधत होते.

ठाकरे पुढे म्हणाले, दोन दिवसापूर्वी अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांकडून जो हल्ला झाला त्याचा निषेध आहेत. यामुळे आपण आज कुठलाही सत्कार स्वीकारणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगून सभेला सुरुवात केली.

गिरीष महाजनांनी आधी वीज द्यावी मग सिंचन प्रकल्पांची भाषा करावी. विखे पाटलांना शिवसेनेने मोठे केले. अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाना साधला.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, अमरनाथ यात्रेवर जर  दहशतवादी हल्ला झाला तर, मुंबई मधून एक ही हज यात्रेचे विमान विमान उडू देणार नाही. आज त्याची अनेकांना आठवण येतेय.

हल्ल्याचा फक्त निषेध करू नका तर पाकिस्तानात घुसून बदला घ्या. पाकिस्तान फक्त शिवसेनेचाच शत्रू नाही तर मग बाकी मुग गिळून का बसलेत. का बोलत नाहीत अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीकास्र सोडले.

नोटबंदीचा सर्वात जास्त शेतकऱ्याला बसला आहे. शेतकऱ्याना साले म्हणतात, अशा शब्दात नाव न घेता रावसाहेब दानवे यांच्यावरदेखील टीका करत थेट अजित पवार आणि यांच्यात काय फरक असेही ठाकरे यावेळीम्हणाले.

बँकेत जर कुणी कर्मचारी शेतकऱ्याला त्रास देत असेल तर त्याला शिवसेनेच इंगा दाखवा. काहीही अडचण असेल तर हक्काने आवाज द्या मी तुमच्यासाठीच आहे. असेही ठाकरे यावेळी म्हणाले. सभेसाठी शिवसेनेचे मंत्री, आमदार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*