Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

शिवसेनेचा नवा फंडा; निवडणूकीआधी मिसळ नंतर तिखटीचा उतारा…

Share

सातपूर । प्रतिनिधी

निवडणुकिपुर्वी मिसळ पार्टीचे आयोजन करणार्‍या शिवसेनेने निकालानंतर ’तिखट’ पार्टीचे आयोजन केले होते. पश्चिम मध्ये पराभव झाला तरी एकजुटिने खिंड लढविणार्‍या शिवसैनिकांसाठी विलास शिंदे यांनी हि मेजवानी दिली. विशेष म्हणजे नुकतेच सेनेत आलेले बाळासाहेब सानपांनीही आवर्जुन उपस्थिती नोंदवलेली होतीे. या शिंदेशाहीच्या ‘तिखट पार्टी’चा जोरदार ठसका ‘इतरांना’ लागला नसला तर नवलच.

पश्चिमची बालेकिल्ला लढवितांना हाती अपयश आले. पण राज्यात आकडयांच्या खेळात सेनेने भाजपला खिंडित पकडल्याचे समाधान तिखटावर ताव मारताना सैनिकांच्या मनात स्पष्ट दिसून येत होते.

शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची गट बांधणी करण्याच्या दृष्टीने मिसळ पार्टीचे आयोजन केले होते या मिसळ पार्टीच्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले होते. सामान्य कार्यकर्त्यांनाही यात स्थान मिळाल्याने पक्षबांधणीसाठी मिसळ पार्टी बहुगुणी उपाय असल्याची भावना राजकीय वर्तुळात रंंगू लागली होती.

दरम्यान निवडणुकीच्या अभियानात शिवसेनेच्या पाठबळावर बंडखोरी करीत विलास शिंदे यांनी विधानसभा लढवली दुर्दैवाने यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला

मात्र या पराभवाने खचून न जाता त्यांनी कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे नोंद घेत श्रमपरिहार म्हणून सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत, ‘तिखटी’चा बेत ठेवला होता. या कार्यक्रमाला शिवसेनेचे बहुतांश पदाधिकार्‍यांनी उपस्थित नोंदवली होती.

त्यात प्रामुख्याने माजी आमदार बाळासाहेब सानप, माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर, डीजे सूर्यवंशी, प्रभाग सभापती संतोष गायकवाड, नगरसेविका नयना गांगुर्डे, राधा बेंडकोळी, गोकुळ निगळ, देवा जाधव, नरेश सोनवण, दीपक आरोटे, सुदाम भावले, किशोर निकम, विजय वाडेकर, प्रकाश काळे, नंदू ब्राह्मणकर, आदींसह नविन नाशिक व सातपूर परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!