Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

उद्धव ठाकरेंसाठी खास पुरणपोळीचा शाही बेत; एनडीएकडून मित्रपक्षांसाठी ‘डिनर’

Share

मुंबई | प्रतिनिधी

भाजपाध्यक्ष अमित शहांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर त्यांनी ‘एनडीए’च्या नेत्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांनी खास पुरणपोळीचा बेत केल्याचे समजते आहे. परंतू ठाकरे या बेतासाठी उपस्थित राहणार नाहीत.

शिवसेनेकडून या पुरणपोळीच्या बेतासाठी सुभाष देसाई हजेरी लावणार आहेत. एनडीएतल्या सर्व घटक पक्षांना भोजनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या भोजनाला हजेरी लावण्याची शक्यता आहे. यावेळी अनौपचारिक चर्चा देखील होईल. तसेच नाराज मित्रपक्षांची मनधरणी करून २३ तारखेला जे निकाल येणार त्यासाठी कशाप्रकारे रणनीती आखावी याबाबतदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यात शिवसेना भाजप सत्तेवर असले तरी अनेकदा सेनेने भाजपची कोंडी केली आहे. सत्तेत राहून विरोधी भूमिकाही बऱ्याचदा सेनेने निभावली होती. त्यानंतर लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीदेखील भाजप सेनेत झाडल्या होत्या. त्यामुळे युती होणार नाही असेच सर्वत्र वाटत होते.

दरम्यान, दोन्हीही पक्ष पुन्हा एकदा युती करून लोकसभेच्या रणांगणात उतरले. त्यानंतर एनडीएकडून एक्झिट पोलचा अंदाज बघता एकत्रित बैठक आणि डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!