Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

खासदार राऊतांनी रुग्णालयातून लिहिला अग्रलेख; फोटो व्हायरल

Share

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांच्यावर शस्रक्रिया झाल्यानंतरदेखील त्यांनी रुग्णालयातून सामनासाठी अग्रलेख लिहिला. सत्तानाट्रयाची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना शिवसेनेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंब्याचे ठोस पत्र न मिळाल्याने  सत्ता स्थापन करण्याचा दावा न करताच सेनेचे पदाधिकारी माघारी फिरले. त्यानंतर राष्ट्रवादीला राज्यपालांनी निमंत्रण दिले. या सर्व घडामोडींमध्ये खासदार राऊत मात्र नव्हते त्यांच्यवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, सामनाचा अग्रलेख कोण लिहिणार, सेना काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते.

मात्र, काल तब्बेत बरी नसतानाही खा. राऊत यांनी आयसीयुमधून अग्रलेख लिहिला. अग्रलेख लिहितानाचे फोटो सोशल मीडियात आज सकाळपासून चांगलेच व्हायरल झाले. पक्षाच्या हितासाठी जीवापाड धडपड करणाऱ्या संजय राऊत यांच्या प्रकृती सुधारणेसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या तर अनेकांनी साहेब, लवकर बरे व्हा तुम्हाला अजून किल्ला लढवायचा बाकी आहे अशा शब्दांत सोशल मीडियात प्रतिक्रिया उमटल्या.

गेल्या 15 दिवसांपासून संजय राऊत रोज सकाळी ते पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. मात्र सोमवारी रुग्णालयात दाखल केल्याने आज ते पत्रकार परिषद घेऊ शकले नाही. परंतु रुग्णालयातही त्यांची लेखणी थांबलेली नाही. रुग्णालयाच्या बेडवरुन त्यांनी सामनासाठी अग्रलेख लिहिला.

रुग्णालयात बसून उद्यासाठी अग्रलेख लिहित असल्याचा त्यांचा एक फोटोही समोर आला आहे. या फोटोमध्ये संजय राऊत रुग्णालयाच्या बेडवर बसलेले दिसत आहेत.

सत्तास्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राष्ट्रवादीची बैठक नुकतीच बैठक पार पडली. यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकार्यांसोबत आज सायंकाळी बैठक होत आहे. दरम्यान राज्यात कोणाची सत्ता स्थापन होणार की राष्ट्रपती राजवट लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!