Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

कोशिश करनेवालों की हार नही होती…: खासदार संजय राऊत यांचे रुग्णालयातून ट्विट

Share

मुंबई :

“लहरों से डर कर नौका पार नहीं होती,
कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।’
बच्चन.
हम होंगे कामयाब..
जरूर होंगे…

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या संजय राऊत यांच्या ट्विटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. संजय राउत यांच्यावर  शास्राक्रिया झालेली असतानाही त्यांनी ट्विटरवर ट्विट करत प्रयत्न करणाऱ्यांना अपयश येणार नाही असे म्हटले आहे.

शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे माध्यमांसमोर मांडणारे संजय राऊत सध्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या रक्तवाहिन्यात दोन ब्लॉक असल्याचे सांगण्यात आले.

त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र लिलावती रुग्णालयामधूनही त्यांनी ट्विट केले आहे. “लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

राज्यात सध्याची राजकीय परिस्थिती अतिशय गुंतागुंतीची झाली आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करणार होती. मात्र ऐनवेळी असे होऊ न शकल्याने शिवसेनेची कोंडी झाली. संजय राऊतांनी रुग्णालयातूनही ट्विट केल्यामुळे शिवसेना अजूनही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणार असलायचे दिसून येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!