Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : संजय राऊत यांच्या बाळासाहेब सानप भेटीने चर्चांना उधान; राजकीय वातावरणात खळबळ

Share

पंचवटी | वार्ताहर 

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज नाशिक पूर्वचे राष्ट्रवादीचे आमदार यांच्या घरी भेट दिल्याने नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खा. राऊत यांच्याकडून जुने मित्र असल्याचे भेट घेतल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

बाळासाहेब सानप यांना भाजपकडून नाशिक पूर्वमधून उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना ऐनवेळी उमेदवारी दिली. तर भाजपने मनसेनेतून पक्षात प्रवेश केलेल्या राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाशिक पूर्वमध्ये दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची लढत झाली आहे.

असे असतानाच आज खा. संजय राऊत यांनी सानप यांच्या घरी भेट दिल्यानंतर नाशिकमध्ये सानप यांना शिवसेना मदत करणार याबाबत चर्चांना उधान आले. नाशिक पश्चिम प्रमाणेच आता पूर्वमध्येही युतीत बंडाळी होण्याची शक्यता असल्यामुळे भाजप उमेदवारांची अडचण वाढली आहे.

खा. राऊत यांनी सानप हे आपले जुने मित्र असल्याचे सांगत त्यांची भेट घेण्यासाठी आपण आलो असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, एका भेटीने सानप यांच्या बाजूने शिवसेना उभी असल्याच्या चर्चा समाजमाध्यमांत व्हायरल झाल्याने दिवसभर खा. राऊत सानप भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात फिरत आहे.

शिवसेना ढिकले यांच्या पाठीमागे उभी राहणार की, राष्ट्रवादीच्या सानप यांना छुपा पाठींबा देणार याबाबतचे चित्र तर येणाऱ्या विधानसभेनंतरच समजणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!