Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

आम्ही येणार-जाणार नाही; पुढची २५ वर्षे शिवसेनेचाच राज्यात मुख्यमंत्री असेल – खा. राऊत

Share

मुंबई | प्रतिनिधी 

राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. शेतीसाठी सुधारणा करण्याचे काम महत्वाचे आहे,   तुम्ही पुढील पाच वर्ष काय घेऊन बसलात. पुढची २५ वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील. आम्ही सारख मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असं म्हणणार नाही. तसेच ये-जादेखील करणार नाही. कायमच शिवसेना सत्तेत राहील असे सांगत खासदार संजय राऊत  यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला.

राज्यात वातावरणीय बदलांचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शिवसेना राज्यातील ओला दुष्काळ, पायाभूत सुविधा अशा बाबींवर लक्ष केंद्रित करून काम करेल. सेनेसोबत आता जे जोडले गेले आहेत त्यांनी अनेक वर्षे सत्ता उपभोगली आहे. मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे.

राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पुढील सरकार हे शिवसेनेच्या नेतृत्वातच येणार आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरीही ते बदलता येणार नसल्याचे राऊत म्हणाले.

राज्याच्या विकासात यशवंतराव चव्हाण यांचे योगदान मोठे आहे. तसेच काँग्रेसच्याही अनेक नेत्यांचे मोठे योगदान लाभले आहे. सर्वांना सोबत घेऊन नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, त्या दिशेने पुढे जायचे आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकसूत्री कार्यक्रम ठरवला असून सत्तेचा फॉर्म्युला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेच ठरवणार असल्याचे खा. राऊत म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!