Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

खासदार संजय राऊत रुग्णालयात दाखल; छातीत दुखू लागल्याने गाठले लीलावती रुग्णालय

Share

मुंबई | वृत्तसंस्था 

शिवसेनेची ढाल असलेल्या खासदार संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांनी लीलावती रुग्णालय गाठले असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होत आहे.

भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यात असमर्थता दाखविल्यानंतर शिवसेनेला राज्यपालांकडून सत्ता स्थापनेचे निमंत्रण मिळाले. यानंतर शिवसेनेने सत्तेची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
सकाळपासून कॉंग्रेस व राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने बोलणी करण्यास सुरुवात केल्यामुळे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार यावर जवळपास शिक्कामोर्तब होण्यावर आले असताना अचानक खासदार राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांनी लीलावती रुग्णालय गाठल्यामुळे सर्वत्र खासदार राऊत यांच्या बातम्या पसरल्या आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!