Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदारांसह जाणार अयोध्येला

Share

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहेत. आपल्या सर्व नवनिर्वाचित खासदारांना घेऊन ते या महिन्याच्या शेवटी अयोध्येत जाऊन राम मंदिराच्या निर्मिताचा आढावा घेतील असे म्हटले जात आहे.

अयोध्या दौरा नक्की कोणत्या तारखेला असेल याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांतच ती जाहीर करण्यात येणार आहे.

यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.सहा महिन्यांपूर्वी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यांत उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला सहकुटुंब भेट दिली होती. यावेळी त्यांनी रामलल्लाचे दर्शनही घेतले होते.

तसेच राम मंदिराच्या निर्मितीचा मुद्दा पुढे आणत केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आधी राम मंदिराच्या बांधणीला कधी सुरुवात करणार ते सांगा त्यानंतरच युतीची बोलणी होईल अशी भुमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती.

त्यावेळी शिवसेना-भाजपा यांच्यात अत्यंत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना-भाजपा यांच्यामध्ये फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर विचार सुरु आहे.

मात्र, जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर शिवसेना नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!