Friday, May 10, 2024
Homeनगरविज बील सक्ती व पिक विमा कंपन्याच्या विरोधात शिवूर बंगला येथे चक्का...

विज बील सक्ती व पिक विमा कंपन्याच्या विरोधात शिवूर बंगला येथे चक्का जाम अंदोलन

वैजापूर |ता. प्रतिनिधी| Vaijapur

निसर्गाच्या लहरींपणामुळे जगाचा पोशिंदा बळीराजा संकटात आहे. कोरोनाच्या काळात जगाला अन्नधान्य आणि भाजीपाला पुरवणारा शेतकरी मात्र अतिवृष्टीमुळे हैराण झाला आहे. आता वेळ त्यांच्यावर आहे. त्यामुळे शासन, प्रशासन आणि विमा, वीज कंपन्यानो शेतकर्‍यांना न्याय द्या, अशी हाक शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली. संभाजीनगर जिल्ह्यात संकटात सापडलेल्या बळीराज्याच्या हक्कासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी दि.1 डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता शिऊर बंगला येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

भिंगार परिसरात नवा गदर

यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांनी सुरुवातीला लोकशाही मार्गाने आंदोलन करून न्याय मागवा, नसता शिवसेना स्टाईलने आंदोलनचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील प्रमुख असलेला मुंबई महामार्ग रोखत थेट राज्य आणि केंद्र सरकारला शिवसेनेने इशारा दिला आहे.

32 कोटींत कोणाचे किती?

यावेळी सहसंपर्कप्रमुख आसाराम रोठे, जेष्ठ शिवसैनिक जिल्हा समनव्यक आनंदीबाई अन्नदाते, उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख प्रकाश चव्हाण, संजय पाटील निकम, भाऊसाहेब गलांडे. रमेश सावंत, सजन शिंदे, तालुका युवधिकारी विठ्ठल पाटील डमाले, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक लता पगारे ,तालुकासंघटक वर्षा जाधव, तालुका संघटक मनोज गायके, उप तालुकाप्रमुख बबन जाधव, भिकन सोमसे, विभागप्रमुख रामदास भागवत, दीपक मतसागर, निझाम सय्यद, मनोज गावडे, अनिल भोसले, बाबासाहेब बडग, उपजिल्हा युवाधिकारी अक्षय साठे, जितेंद्र जगदाळे, सुदाम जाधव, भगवान इंगळे, अनिल मोईम, बाबासाहेब जाधव, शिवाजी दरेकर, नाना मदाडे, निवृत्ती सताळकर, संतोष निकम, निवृत्ती भवर, अप्पा मगर, प्रकाश शिंदे, कल्याण बोडखे, दौलत निकम, ताराचंद वेळंजकर.यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

जिल्ह्यातील 21 संस्थांच्या निवडणुका लांबणीवर

यावेळी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नागटिळक, योगेश पवार,व अविनाश भास्कर, गणेश गोरक्ष ,विशाल पैठणकर, गणेश जाधव यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या