Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

जे ठरले होते, तेच आम्हाला हवे आहे; अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम – उद्धव ठाकरे

Share

मुंबई  | प्रतिनिधी

राज्यात सत्तास्थापनेचा पेचप्रसंग वाढतच चालला आहे. आज शिवसेना आमदारांची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. यावेळी या बैठकीत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम असल्याचा निर्णय झाला. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही. जे ठरलं होते तसे होणार असेल तरच भाजपने प्रस्ताव घेऊन यावा अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतल्यामुळे सेना भाजपमधील वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे.

ठाकरे हे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे या मागणीवर ठाम आहेत. आम्हाला मुख्यमंत्री पद पहिली अडीच मिळावे की, नंतरची अडीच वर्षे मिळावे हा वाद नसून लोकसभेआधी जे ठरले होते तेच व्हायला हवे आम्हाला यातील काहीही वेगळे नको.

मला स्वत:हून युती तोडायची इच्छा नाही, असे स्पष्ट करत भाजपवर निशाणा ठाकरेंनी साधला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील तिढा आणखी वाढला आहे. शिवसेनेचे निर्माण स्वाभिमानातून झाले आहे.

आम्हाला भाजपला बाजूला करायचे आहेत असे अजिबात नाही. मी माझा निर्णय योग्यवेळी जाहीर करेन, मात्र शिवसेना आधी ठरल्याप्रमाणे फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार रंगशारदा या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!