Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

कॉंग्रेससोबत सकारात्मक चर्चा; जे ठरेल ते तुमच्यासमोर येईलच – उद्धव ठाकरे

Share
जेएनयुमधील भ्याड हल्ल्याने मुंबईतील २६/११ ची आठवण करून दिली - मुख्यमंत्री, cm shivsena uddhav thackeray on jnu violence

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत नुकतीच बैठक संपली. वांद्रेमधील हॉटेल ट्रायडंटमध्ये ही पहिली बैठक झाली.

दीडतासापासून काँग्रेस कार्यकर्त्यांशी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची चर्चा सुरु होती. या चर्चेतून बाहेर आल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘चर्चेला सुरूवात झाली आहे, चर्चा योग्य दिशेने जात आहे.

तसेच चर्चा अंतिम टप्प्यात येईल, आणि जे काही अखेर ठरणार आहे, ते तुमच्यासमोरही येणार आहे’ असल्याचे ठाकरे याप्रसंगी म्हणाले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेसकडून शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या.

सत्ता स्थापनेसाठी देण्यात आलेल्या वेळेत संख्याबळ राष्ट्रवादी आणि शिवसेना सिद्ध करू शकले नसले तरी राष्ट्रपती राजवटीच्या काळात राष्ट्रपती पुन्हा एकदा राज्यातील पक्षांना सत्ता स्थापणेसाठी निमंत्रण देतील. यानंतर सेनेकडून संख्याबळ सिद्ध केले जाऊन सेनेचा मुख्यमंत्री विराजमान होण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!