Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

लोकसभा उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक अधिकार व दावा : संजय राऊत

Share

मुंबई दि. ०६: लोकसभेतील उपाध्यक्षपद हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही आमची मागणी नाही तर तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजप-शिवसेनेत सत्तेतील सहभागावरून धुसफूस सुरु झाल्याचे बोलले जात असून एका मंत्रिपडावामुळे शिवसेनेतील नाराजी समोर आली आहे .

लोकसभेचे निकाल मागील महिन्यात आले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपने मोठे यश मिळवले. भाजपचे स्वबळावर ३००हून अधिक जिंकल्या तर मित्रपक्षांनीही ५० हून अधिक जागा जिंकल्या. यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला १८ जागा मिळाल्या. मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपने मित्रपक्षांना मानाचे पान दिले आहे.

शिवसेनेला केवळ १ कॅबिनेट मंत्रीपद देताना ते ही दुय्यम दिले. जेडीयूलाही एतच मंत्रिपद देऊ केले होते. त्यामुळे नाराज नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला. नितीशकुमार यांनी उघड नाराजी व्यक्त केली तरी शिवसेनेने याबाबत काही भाष्य करण्यास नकार दिला. भाजपचा निर्णय सेनेला पटला नसला तरी त्यांच्यापुढे पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी चुप्पी साधली आहे.

लोकसभा अध्यक्षांची निवडणूक १९ जून रोजी होती. त्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. याबाबत मनेका गांधींसह भाजपच्या काही नेत्यांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे शिवसेनेने लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे. मात्र, भाजप हे पद शिवसेनेला देईल का याबाबत शंका आहे. कारण एनडीएत नसलेल्या बीजेडी किंवा वायएसआर आदी पक्षाना लोकसभेतील उपाध्यक्षपद देऊन राज्यसभेतील बहुमताची बेगमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याची कुणकुण शिवसेनेला लागताच त्यांनी लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार असल्याचे वक्तव्य केले आहे. एनडीएमध्ये भाजपनंतर शिवसेनेचे सर्वाधिक १८ खासदार निवडून आले आहेत. नितीशकुमार यांच्या जेडीयूचे १६ खासदार निवडून आले आहेत. प्रादेशिक पक्ष बीजेडीचे १३ तर जगनमोहन रेड्डींच्या पक्षाचे २२ खासदार निवडून आले आहेत. या दोन पक्षांना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!