Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

‘अवजड उद्योग’ खाते देऊन शिवसेनेची बोळवण; शिवसैनिकांचा हिरमोड

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळ्यानंतर आज दुपारी खातेवाटप जाहीर करण्यात आले. यामध्ये कुठल्या पक्षातील नेत्यांना कुठली खाते मोदी सरकार देईल याबाबत सगळीकडेच तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र, पहिल्या दोन, तीन आणि चार क्रमांकाचे खाते वगळता इतर खाते मात्र तसेच ठेवण्यात आली आहेत.

शिवसेनेचे तत्कालीन खासदार अनंत गीते यांना कॅबिनेटचे अवजड उद्योग खाते देण्यात आले होते. तेच खाते शिवसेनेचे नवनियुक्त खासदार डॉ. अरविंद सावंत यांना देण्यात आले. दुसरे आणि मोठे खाते शिवसेनेला मिळेल अशी आशा शिवसैनिकांना होती. मात्र, तेच खाते मिळाल्याने शिवसैनिक काहीसे नाराज झाले आहेत.

मोदींच्या शपथविधीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवस आधीच दिल्लीत पोहोचले होते. यावेळी ते सेनेला दोन कॅबिनेट मंत्रिपद तर एक रेल्वेमंत्रीपद सेनेला मिळावे याबाबत मागणी करतील अशी चर्चा होती. त्यामुळे मोठी खाती शिवसेनेला मिळतील अशी आशा कार्यकर्त्यांना होती. मात्र, शिवसेनेच्या पदरी जुनेच खाते आल्यामुळे काहीसा हिरमोड झालेली परिस्थिती शिवसेनेच्या गोटात आहे.

भाजपचे अध्यक्ष राहिलेल्या अमित शहांकडे यावेळी गृह मंत्रालयाचा कारभार सोपविला. तर निर्मला सीतारमन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. मोदी पर्व एकमध्ये गृहमंत्रीपद भूषविणारे राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खातं देण्यात आले आहे.

शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींसह ५७ खासदारांनी शपथ घेतली. यामध्ये २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश होता. राजनाथ सिंह यांच्यानंतर डॉ. सुब्रमण्यन जयशंकर यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!