Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

शिवसेना मुदतीत सरकार स्थापन करण्यात अपयशी; राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास दिला नकार

Share

मुंबई | प्रतिनिधी 

शिवसेनेला राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सत्ता स्थापन न करता आल्यामुळे आता राज्यपालांकडून राष्ट्रावादीला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले जाणार आहे. मुदतीत सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे शिवसेनेपुढे आता पेच प्रसंग निर्माण झाला आहे. दरम्यान, राज्याची वाटचाल आता राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरु असल्याचे चित्र आहे.

राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी दिलेल्या २४ तासांत दोन्ही पक्षांची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने यात विलंब झाल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, आदित्य यांनी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितली होती. मात्र, राज्यपालांनी नकार दिल्याने शिवसेनेला २४ तासांत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला अपयश आले आहे.

आजच्या सायंकाळच्या घटनेने राज्याची राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने वाटचाल सुरु झाल्याचे चित्र आहे.  राज्याचा सरकार स्थापनेचा तिढा वाढला असुन शिवसेनेला दिलेल्या मुदतीत सरकार स्थापनेचा अयशस्वी झाल्याने राज्याची राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरू झाली आहे.

शिवसेनेला सत्ता स्थापनेचा करण्यासाठी राज्यपालांनी आमंत्रण दिले होते परंतु 24 तासात शिवसेनेला सरकार स्थापनेचा दावा करता आला नाही. तत्पूर्वी आदित्य ठाकरेसह गटनेते एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली. परंतु राज्य पालांनी मुदत वाढवून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची अवस्था तळ्यात मळ्यात झाली आहे.

पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन्ही पक्षांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. राज्यपालांनी दिलेला वेळ कमी पडला आहे. पक्षाच्या प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उशीर झाला. दरम्यान, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल तसेच शिवसेनेच्या अधिपत्याखाली स्थिर सरकार शिवसेना देईल असेही आदित्य याप्रसंगी म्हणाले.

राज्यपालांनी मुदत वाढवून दिली नसल्यानेच गोंधळ झाल्याची माहिती माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच राष्ट्रवादीशी बोलणी करून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील ते मान्य असेल असे ठाकरे यावेळी म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!