Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

शिवसेनेकडून फडणवीस यांचा ‘मावळते मुख्यमंत्री’ असा उल्लेख

Share

मुंबई | प्रतिनिधी 

राज्यात सत्ता स्थापनेवरून सुरू झालेल्या संघर्षामुळे शिवसेना-भाजपमधील तणाव दिवसेंदिवस वाढतच चालेलला दिसून येत आहे. यामुळे शिवसेनेची भूमिका शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध होत असल्यामुळे सामनाच्या अग्रलेखाकडे इतर माध्यमांचेही लक्ष लागून आहे. आजच्या अग्रलेखात शिवसेनेने नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली असून फडणवीस यांना मावळते मुख्यमंत्री असा उल्लेखही करण्यात आला आहे.

शिवसेनेने भाजपवर टीकेचा ‘बाण’ सोडल्यामुळे पुन्हा एकदा भाजप सेनेत खडाजंगी झाली आहे. तिकडे भाजप नेते मात्र जीवाच्या आकांताने युती होईल मुख्यमंत्री महायुतीचा होईल असे सांगत आहेत. तर सेना शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ ग्रहण करेल असे सांगत आहे. त्यामुळे सेना भाजपच्या राजकीय घडामोडीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

काय आहे अग्रलेखात?

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा संदर्भ घेत दिल्ली गढूळ, महाराष्ट्र स्वच्छ, पुढचे पाऊल कधी? असा सवाल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्याच्या मऱ्हाटी जनतेसाठी महत्त्वाचे आहे. पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा आणि त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेऊन राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे असे म्हणत भाजपवर शरसंधान साधले आहे. तसेच नवे राज्य मोकळ्या वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ‘कौल’ दिला आहे. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल, असे म्हणताना फडणवीसांचा उल्लेख ‘मावळते मुख्यमंत्री’ करण्यात आला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!