Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर 15, श्रीरामपुरातून 5 जण इच्छुक

Share

शिवसेना नेत्यांनी घेतल्या मुंबईत मुलाखती

अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपाशी युती न झाल्यास स्वबळावर विधानसभा निवडणुका लढण्याची शिवसेनेने तयारी केली असून नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती शिवसेना भवन येथे शिवसेना नेते डॉ. दीपक सांवत, अरविंद नेरकर, निलम गोर्‍हे, वरूण सरदेसाई यांनी घेतल्या. शिवसेनेच्यावतीने संगमनेर विधानसभा मतदार संघासाठी 15 जणांनी मुलाखती दिल्या तर श्रीरामपुरातून 5 जण इच्छुक आहेत.

यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा संघटक विजय काळे, संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी, उपशहरप्रमुख पप्पू कानकाटे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, महिला आघाडी तालुका प्रमुख शीतलताई हासे, सुरेखा गुंजाळ, रेणूका शिंदे, शिवसेना अकोले तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, प्रमोद मंडलिक, बाजीराव दराडे, डॉ. विजय पोेपेरे, महेश देशमुख, मदन हडके, राजेश तांबे, राजेंद्र देवकर, दादासाहेब कोकणे, सरपंच ज्ञानेश्‍वर वडितके, सचिन बडदे, कैलास भणगे, शिवाजी बिशागर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ शेळके मुलाखतीसाठी जाऊ शकले नाहीत. त्यांच्यावतीने त्यांचा बायोडाटा पक्षप्रमुखांकडे देण्यात आला.

पक्षप्रमुखांना भेटलेल्या शिष्टमंडळात नेवासा तालुका उपप्रमुख मालोजीराव गटकळ, पंकज लांभाते, मकरंद राजहंस यांचेसह सारंग फोफसे, रामानंद मुंगसे यांचाही समावेश होता. दरम्यान नेवासा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा जो उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्याचा निर्धार संपर्कप्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी व्यक्त केला.

या इच्छुकांनी दिल्या मुलाखती

संगमनेर- साहेबराव नवले, विक्रमसिंह खताळ, जनार्दन आहेर, बाबासाहेब कुटेे, कैलास वाकचौरे, आप्पा केसेकर, संजय फड, जयवंत पवार, अशोक सातपुते, संग्राम जोंधळे, शरद थोरात, दिलीप साळगट, विठ्ठल घोरपडे, दत्तू नाईक, शरद पावबाके
श्रीरामपूर- आ. भाऊसाहेब कांबळे, डॉ. चेतन लोखंडे, देविदास निकम, सुरेश वाकचौरे, शुभांगी शेटे.
कोपरगाव- जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे, बाळासाहेब जाधव, प्रमोद लबडे, नितीन औताडे.
नेवासा- तालुक्यातून तालुकाप्रमुख मच्छिंद्र म्हस्के, विधानसभा संघटक रामदास गोल्हार.
शिर्डी- कमलाकर कोते, राहाता उपनगराध्यक्ष राजेंद्र पठाडे, विजय काळे.
अकोले- मधुकर तळपाडे, सतीश भांगरे, मारुती मेंगाळ व पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर व अकोले तालुक्यातील अंभोळच्या कन्या शकुंतला धराडे
नगर शहर – अनिल राठोड, संभाजी कदम, शीला शिंदे, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे
राहुरी – अऩिल कराळे, गोविंद मोकाटे
पारनेर – आ. विजय औटी, संदेश कार्ले
शेवगाव-पाथर्डी –अशोक थोरवे, रामदास भोर, अविनाश मगर
कर्जत-जामखेड- राजेंद्र दळवी

काँग्रेसकडून श्रीरामपुरात ओगले, जाधव, डोळस यांच्यासह 19 जणांची तयारी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची इच्छा काल 19 उमेदवारांनी व्यक्त केली.

येथील शासकीय विश्रामगृह येथे आ. डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा संघटक बाबासाहेब कोळसे, रियाज पठाण, नगरसेवक मुख्तार शाह, भारत भवार आदी प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये 21 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या.

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. याआगोदर स्व. जयंतराव ससाणे हे काँग्रेसकडून दोन पांचवार्षिक श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. त्यानंतर या विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होऊन तो राखीव झाला. नंतर स्व. जयंतराव ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब कांबळे यांनी दोन पंचवार्षिक या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. आता राखीव झाल्यानंतर तिसर्‍या पंचवार्षिक मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आपल्याला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल, या अपेक्षेने अनेकजण इच्छुक आहेत.

काल मुलाखती दिलेल्या उमेदवारांमध्ये अगोदर शिवसेनेकडून इच्छुक असलेले सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, काँग्रेसचे राष्ट्रीय युवक सरचिटणीस हेमंत ओगले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, डॉ. वसंतराव जमधडे, भाऊसाहेब डोळस, प्रा. प्रताप देवरे, पी.एस.निकम, कार्लस साठे, विजय खाजेकर, भारत तुपे, अशोक बागुल, छायाताई सरोदे, प्रभाकर कांबळे, विलास खाजेकर, युवराज बागुल, बापुराव त्रिभुवन, सुरेश जगधने, अ‍ॅड. गोविंद अमोलिक, के.सी.शेळके आदींचा समावेश आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!