उत्तर प्रदेश : अलाहाबादमधून निवडून आला शिवसेनेचा उमेदवार

0

भाजपने उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांमध्ये दिमाखदार यश मिळवल्यानंतर भाजपने पालिका निवडणुकांमध्येही विजयीरथ कायम राखला आहे.

या निवडणुकीत भाजपने बाजी मारली असली, तरी शिवसेनेनेही स्थानिक स्वराज संस्थांच्या या निवडणुकांमध्ये खाते उघडले आहे.

अलाहाबाद येथून शिवसेनेचा एक उमेदवार निवडून आला आहे.

विजयी झालेल्या उमेदवाराचे नाव दीपेश यादव असे आहे. यादव अलाहाबादमधील वॉर्ड क्रमांक-40 मधून निवडून आले.

ही माहिती ट्विटरवरुन शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेअर केली आहे.

उत्तर प्रदेशातील काही महापालिकांमध्ये शिवसेनेने आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते.

LEAVE A REPLY

*