Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

राठोड यांच्यासह पाचजण उमेदवारीसाठी मैदानात

Share

माजी महापौर शिंदे, फुलसौंदर, कदम यांनीही दिल्या मुंबईत मुलाखती

अहमदनगर (प्रतिनिधी) –  केवळ चर्चा नव्हे तर नगर शहर मतदारसंघातून शिवसेनेकडे एक नव्हे तर पाच जणांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातील तिघांनी उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

नगर शहर मतदारसंघात पाचवेळा आमदार झालेले शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना मागीलवेळी पराभव पत्करावा लागला होता. मात्र यावेळी पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे बोलले जात असतानाच शिवसेनेतूनच स्पर्धा वाढल्याने त्यांच्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिवसेनेच्या इच्छुकांच्या बुधवारी मुंबईत मुलाखती होत्या. शिवसेनाभवन येथे झालेल्या या मुलाखतींना राठोड, शीला शिंदे व भगवान फुलसौंदर या माजी महापौरांसह माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी मुलाखती दिल्या. रात्री उशिरापर्यंत नगर जिल्ह्याच्या मुलाखती सुरू होत्या.

राठोड यांना आतापर्यंत शिवसेनेत कधीच स्पर्धा झाली नव्हती. आता मात्र एकाचवेळी राठोड समर्थक असलेलेच इच्छुकांच्या रांगेत आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. नगरसेवक अनिल शिंदे हे राठोड यांचे समर्थक मानले जायचे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राठोड-शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाला. महापालिकेच्या राजकारणावरून हा दुरावा झाल्याचे बोलले जाते. याच कारणावरून कदम आणि राठोड यांच्यातही दुरावा झाला. शिंदे, कदम आणि फुलसौंदर यांचे वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध आहेत.

राठोड ठाकरे यांना भेटले
मुलाखतीनंतर अनिल राठोड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांना श्रीरामाची प्रतिमा भेट दिली. या भेटीत त्यांच्यासमवेत शहरप्रमुख दिलीप सातपुते, दत्ता जाधव यांच्यासह काही कार्यकर्ते होते. यावेळी उमेदवारीबाबत काही चर्चा झाली का, ते समजू शकले नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!